( कंधार दिनांक 31 जुलै तालुका प्रतिनिधी )
नांदेड जिल्ह्यातील नुकत्याच झालेल्या पोलीस भरती मध्ये बोरी (बु.) तालुका कंधार येथील विद्यार्थिनी कुमारी क्रांती उत्तम व्यवहारे या मुलीने घवघवीत यश संपादन केले असून,सर्वमासान्य शेतकरी कुटुंबातील क्रांती ची पोलीस दलामध्ये वयाच्या आठराव्या वर्षी गुणवत्तेवर क्रांती ची पोलीस दलामध्ये निवड झाली.
या यशाबद्दल आज कंधार येथे सामाजिक कार्यकर्त्या तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ.वर्षाताई भोसीकर यांनी कुमारी क्रांती चा सत्कार करून भावी कार्याच्या शुभेच्छा दिल्या.
क्रांती चे शिक्षण इयत्ता 12 वी झाले असून तिने मुंडे अकॅडमी कंधार येथे क्लास केले होते.याप्रसंगी सौ. वर्षाताई यांनी सर्व मुलींना आवाहन केली की कु.क्रांती चा असाच प्रकारे सर्व मुलींनी आदर्श घेऊन उच्च शिक्षण घेत यश संपादन करावे व आपल्या कुटुंबाचा गावचा मान वाढवावा अशा प्रकारच्या शुभेच्छा,सौ.वर्षाताई यांनी दिल्या यावेळी संजय शिक्षण संस्था कंधार चे उपाध्यक्ष कृष्णाभाऊ भोसीकर,प्रभाकर व्यवहारे उपस्थित होते कुमारी क्रांतीच्या यशाबद्दल सर्व नागरिकांतून कौतुक होत आहे.