कंधार (प्रतिनिधी)
अनेक अडी अडचणींचा सामना करीत नांदेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील रहिवासी असलेल्या शितल गोमस्कर हिने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या तिरूपतीस्थित महाविद्यालयात ज्युनिअर असिस्टंट या पदविका परीक्षेसाठी प्रवेश मिळविला असल्याने फैज लॅबचे प्रमुख गुलाम शाहिंदर यांनी शितल गोमस्कर यांच्या राहत्या घरी जाऊन सत्कार करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या वेळी शितल गोमस्कर यांच्या आई, वडील व मित्रपरिवार उपस्थित होते.
घरात अठराविश्व दारिद्र्य असतांना त्यावर मात करीत शितल गोमस्करने यशाचे शिखर गाठले आहे. आई लक्ष्मीबाई मोलमजुरी करणारी, वडील संतोष
रिक्षाचालक, आजोबा वॉचमन आणि आजी खाजगी रुग्णालयात काम करते. घरात शिक्षणाचा कुठलाही वारसा आणि वातावरण नाही आणि सातत्याने साथ देत नसलेले आरोग्य यामुळे शितलसमोर अडचणींचा डोंगर होता; परंतु मनात शिक्षणाची जिद्द असणाऱ्या शितल गोमस्कर हिने या सर्वच अडचणींवर मात करीत ज्युनिअर सायंटिस्ट अर्थात कनिष्ठ शास्त्रज्ञ या पदविका अभ्यासक्रमासाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. शितल गोमस्कर हिची असलेली शिक्षणाविषयीची आत्मीयता व त्यासाठी मेहनत करण्याची जिद्द व चिकाटी पाहून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले डॉ. सुभाष वाठोरे यांनी शितलला शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतले होते.
शिक्षणाच्या आवड व त्या आड येणारी परिस्थिती यामधील दुवा बनून डॉ. विकास वाठोरे यांनी शितलला सर्वतोपरी मदत केली. एकीकडे विद्यार्थ्यांची ओडॉक्टर, इंजिनिअर या क्षेत्राकडे असतांना शितल गोमस्कर हिने डॉ वाठोरे यांच्या
मार्गदर्शनाखाली कनिष्ठ संशोधक या पदविका अभ्यासक्रमासाठी असणाऱ्या सर्व बाबींची तयारी केली. आयआयएसई आरसारख्या मोठी स्पर्धा असणाऱ्या परीक्षेत शितलने यश मिळवत पहिली शास्त्रज्ञ होण्याचा मान मिळवणार आहे.
*आपल्या नांदेड ची विद्यार्थिनी शितल ऑल इंडिया तसेच महाराष्ट्र चॅनेल वर पण झळकत आहे हे आपल्या सर्व नांदेडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, शितल व त्या कष्टकरी माय बापाचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा
*डॉ.विकास वाठोरे*
*संचालक,डॉ.वाठोरे बायोलॉजी क्लासेस.नांदेड