अमरनाथ वैष्णोदेवी यात्रेला गेलेल्या दुसऱ्या जत्थ्यातील १०३ यात्रेकरूंचे मंगळवारी नांदेड येथे आगमन

 नांदेड ; अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अमरनाथ वैष्णोदेवी यात्रेला गेलेल्या दुसऱ्या जत्थ्यातील १०३ यात्रेकरूंचे मंगळवारी नांदेड येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले असून अविस्मरणीय यात्रा झाल्याबद्दल सर्व यात्रेकरूंनी ढोल ताशाच्या गजरात भांगडा करत आनंद व्यक्त केला.

दिलीप ठाकूर यांनी आतापर्यंत शेकडो भाविकांना घेऊन २४ वेळा अमरनाथचे तर २७ वेळा अमरनाथचे विक्रमी दर्शन घेतले आहे. नांदेड येथे आल्यानंतर लायन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष शिवाजी पाटील, गौरव दंडवते, दिपेश छेडा,राजेशसिंह ठाकूर,संतोष भारती,प्रभुदास वाडेकर, संतोष बच्चेवार यांच्यासह अनेक नातेवाईक व मित्रांनी पुष्पवृष्टी करत बम बम भोले च्या गजरात स्वागत केले.दुसऱ्या जत्थ्यामध्ये ५५ पुरुष व ४८महिलांचा समावेश होता.१९ जुलै रोजी दिलीप ठाकूर व संदीप मैंद यांच्या नेतृत्वाखाली ९२ यात्रेकरू,३ टूर मॅनेजर व ६ केटरिंग टीमचे सदस्य नांदेड येथून रवाना झाले होते.बारा दिवसाच्या कालावधीत अमरनाथ, वैष्णोदेवी, खीरभवानी, श्रीनगर, गुलमर्ग,दिल्ली या स्थळांना भेटी देण्यात आल्या.टूर मॅनेजर म्हणून विशाल मुळे, मिलिंद जलतारे, लक्ष्मीकांत जोगदंड यांनी प्रत्येक यात्रेकरूंची वैयक्तिक काळजी घेतली. ठाणे येथील नयन वेखंडे यांच्या केटरिंग टीमच्या सदस्यांनी वेळेवर ताजे व रुचकर खाद्यपदार्थ दिल्यामुळे सर्वांची प्रकृती उत्तम राहिली. उत्कृष्ट वातानुकूलित निवास व्यवस्था,आरामदायी बसेस आणि भरपूर मनोरंजनामुळे सर्व यात्रेकरू समाधानी आहेत. नांदेड ते जम्मू रेल्वे चा प्रवास केल्यानंतर तीन वातानुकूलित बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.पहिल्या बसमध्ये रत्नामाला व संतोष व पालेकर,सुरेखा व डॉ.उत्तम इंगळे,विजया व डॉ.जीवन पावडे,जयालक्ष्मी व भारत गादेवार, मीनाक्षी व गोविंद नलबळवार,जयश्री व अनिल मुक्कावार,प्रतिभा व विकास गादेवार,सीमा व शंकर गुंडावार,
मंगलबाई व पंडितराव माळोदे, अरुणा नळबलवार,
आदित्य नलबलवार,सुचिता व विनोद अल्लमपल्लेवार,
मुक्ता व अभयकुमार भावठाणकर,सुनंदा व दिगंबर कावळे, अंजमा, अनुजा चिंतलवार,मनकर्णा दंतुलवार,देवेंद्रा पुलेलू, रजनी पाटील, प्रेमा शिंदे, छाया सिंगनवाड, प्रेमा शिंदे यांचा समावेश आहे.

दुसऱ्या बस मध्ये स्नेहल व साईनाथ पदमावार, प्रतिभा व जयप्रकाश चोधरी, प्रज्ञा व अजय क्षीरसागर, प्रमोद पाटील, गणेश काप्रतवार,परशुराम शिंदे,कैलास डाकोरे ,गणपत गुरुपवार ,श्रीराम अरुटवार,सुरेश इंदूरकर ,अनिला व गणेश उंबरकर,भाग्यश्री व संतोष चोधरी, सायली व साईनाथ लव्हेकर,स्वरूपा दिग्रसकर,स्मिता दिग्रसकर, रुपाली दिग्रसकर,जयश्री व अनिल चालीकवार,विमल व विलास चिद्रावार, शालिनी व मधुकर पोलशेठवार,राजश्री व राजेश्वर गादेवार,ज्योती व शंकर वट्टमवार,भारतीबाई व आनंदा शिंदे ,ओंकार पदमावार यांचा समावेश होता.निर्गुना व डॉ.विलास चाटे, सिंधु व दिलीप माने,प्रा.महेश लक्ष्मीबाई व व्यंकट पवार,रत्नमाला व रामचंद्र जाधव,मीनादेवी व मोतीलाल अग्रवाल,डॉ. व डॉ.हनुमंत बरकते, रुख्मिणी व बालाजी बामणे, प्रा.वैजयंता व गणेश देसाई, सरिता व गजानन देसाई,अनुसया व संजय कदम,राजेश पाटील हे तिसऱ्या बसमध्ये बसलेले होते. दिलीप ठाकूर यांनी दोन महिन्यापासून चालण्याची व प्राणायामची पूर्वतयारी घेतली असल्यामुळे अवघड असलेल्या अमरनाथ यात्रेत कोणालाही त्रास झाला नाही. भाऊ ट्रॅव्हल्स व माय हॉलिडेज च्या वतीने अतिशय नियोजनबद्ध यात्रा आयोजित केल्याबद्दल सर्व भाविकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *