उच्च शिक्षित अधिकारी वर्ग स्वगृही परतण्याच्या मार्गावर

मागच्या दोन वर्षांपूर्वी मी लिहिलेला लेख आज थोड्याशा दुरुस्तीसह पुन्हा टाकत आहे. त्यावेळी मी केलेलं भाकीत यावर माझ्या मनात थोडी शंका होती. यी शंका दूर होऊन मी केलेलं भाकीत आता सत्त्यात उतरत आहे त्यामुळे मला खात्री आहे की आमच्यातील उच्चशिक्षित विचारवंत अधिकारी वर्ग लवकरच आपल्या स्वगृही परतणार आहे……
जेव्हा जेव्हा मी यांना भेटलो मानाचा जयभीम केला तेव्हा तेव्हा त्यांनी नुसती मानच हलविली. जयभीम काही म्हटलं नाही. जेव्हा यांच्या बैठकीत गेलो तेव्हा यांच्या आलिशान फडताळात विदेशीचे अनेक ब्रँड पहिले आणि उगीचच बावीस प्रतिज्ञाची आठवण झाली आणि मलाच चुकल्या चुकल्या सारखे वाटू लागले…
जेव्हा मी यांच्या किचन मध्ये गेलो तेव्हा तिथे देव्हारा मांडलेला पहिला. इंग्रजी पोशाखतली मॅम देव्हारा अगदी सुसज्ज ठेवलेला होता…. तिथेही बावीस प्रतिज्ञा मनात डोकावून गेल्या…..मॅम इंग्रजी पोशाखात असल्या तरी आपले सण उत्सव त्या अजिबात विसरल्या नाहीत. दसऱ्याचे सोने लूट,दिवाळीची ओवाळणी संक्रांतीचे तिळगुळ होळीला रंगपंचमी , पाडव्याची गुढी, पंचमीचे झोके असे सारेच गावठी सण उत्सव त्या आनंदाने साजरे करतात… साहेबांनीही सोलाएवढे करदोरे दरसाल बांधून घेतात. सत्यनारायणाचा प्रसाद आवर्जून घेतात. नवीन काही आले की त्याची गुरुजीच्या हातून पूजा घातली जाते
सारे काही रीतसर……

शिक्षणाचा महामंत्र अनुसरून पहिल्या पढीने जे यशोशिखर गाठले.मोठ मोठी पदे मिळविली.अधिकाराच्या जागा कबीज केल्या.हजारो वर्षांपासून उपेक्षित वंचित असणारे जादूची कांडी फेरवावी आणि चमत्कार घडावा तसेच काही घडले. आमच्या वस्तीचा चेहरामोहराच बदलला.बाबासाहेबांनी मृतमास खाणे बंद करा असा आदेश देताच खेड्यापाड्यातील आडाणी माणसांनी मडके फोड मोहीम राबविली आणि मृत मास खाणे बंद झाले.महाड सत्याग्रहात आपली ओळख दर्शविणारे दागिने फेकून द्या म्हणताच आडाणी बायकांनी सारे कथलाचे दागिणे फेकून दिले.पुरूषांनी आपल्या हातात बांधलेली गुलामीची ओळख दर्शविणारे काळेदोरे तोडून फेकले..धर्मांतरानंतर तरआमचे सारेच रितीरिवाज बदलले.हळदीची लग्न सोडली.आमचे चेहरा नसलेले देव सोडले, उपास तपास सोडले. कंदुरी, जागरण, सत्यनारायण सोडला. नवस सायास सोडले. पोरं शाळेत घातली. उपाशी राहून पोरांच्या पुस्तकासाठी पैसे जमविले पोरं शिकली. मोठ्या औद्यावर चढली….

 

मात्र आता आडाणी आईवडीलांनी फेकून दिलेल्या रूढीपरंपरा उच्चशिक्षित जनरेशनने हळू हळू पुन्हा अनुसरण्यास आरंभ केला आहे…आमचे वाढदिवस आता बिर्याणीशिवाय होत नाहीत.बुद्धपुजाही मांडतो आणि कंदुरीही करतो.माझ्या एका डाॅ. मित्राने मुलीचा वाढदिवस थाटामाटात साजराकेला मी उपाशीच परत आलो… कारण माझ्यासारख्या खेडुतासाठी तिथे भाजी पोळी नव्हती.तर बिर्याणीचा घामघमाट बुद्ध रूपाच्या पुढे मांडलेल्या पातेल्यातून येत होता..
मी उपाशी परत आलो म्हणून दस-या वर्षी डॉक्टरांनी स्वीट भोजन ठेवलं तर तुरळक लोक आले सर्व अन्न फेकून द्याव लागलं. या वर्षी पुनः बिर्याणी ठेवली तर सर्व उच्चशिक्षित महिलापुरूष बिर्याणीवर तुटून पडलेले.मी नेहमी प्रमाणे 1205 वा ग्रंथ मुलीला भेट दिला आणि सरळ घरी परतलो.बुद्ध पद्धतीने विवाह करून माळेगाव, बडापहाड,जेजुरी शिर्डी, बालाजी आणि वगैरे वगैरे आटोपून संसारगाडा सुरू होते.असे का म्हटलं तर म्हणतात..हे पण कराव लागतं आणि ते पण…..
आडाणी बापाने फेकून दिलेले गंडेदोरे आमचे मुलं हौसेने हातात बांधतात….शिकलेल्या काळ्या,गो-या,नकट्या चपट्या आमच्या सा-याच मुली दृष्ट लागूनये म्हणून पायात काळाधागा बांधतात…लग्नात हळदीचा संस्कार मोठ्या थाटामाटात संपन्न होतोय. कुटुंब जेवढे श्रीमंत तेवढा हळदीचा कार्यक्रम भन्नाट…..
अडाणी आईबापानी सोडलेले सर्व रितिरिवाज आता पुन्हा चालू झालेले आहेत…

 

याच्याही पुढे आता आमची उच्चपदस्त विचारवंत मंडळी आता गावोगावी बैठाका घेत आहेत. काँग्रेस पक्ष हाच आपला तारणहार आहे असा त्यांना साक्षात्कार झालेला आहे. म्हणून ते आपल्या माणसांना काँग्रेस च्या दावनीला बांधण्यासाठी घेऊन जात आहेत. आंबेडकरी चळवळ आता त्यांच्या कामाची राहिलेली नाही. जेव्हा त्यांना बॉस जातीवर शिवीगाळ कारी तेंव्हा त्यांना आंबेडकरी चळवळ आठवत असे. प्रमोशन रुकले चळवळ आठवत असे. ओपन कॉलोनीत घर मिळाले नाही की चळवळ आठवायची.आता या रिटायर्ड गँगने काँग्रेस पुढऱ्यांची चाकरी करून करून बरेच घबाड जमवलेलं आहे. आता ते घबाड सहिसलामत रहावे म्हणून काँग्रेसचा जप चाललेला आहे. जाणत्या राजाने दिलेला हुकूम घेऊन ते गावोगाव भटकंती करीत आहेत. संविधान धोक्यात आहे. लोकशाही धोक्यात आहे. तुमचा नेता स्वबळावर निवडून येऊ शकत नाही. आता काँग्रेस बदलली आहे वगैरे वगैरे…
एकूण काय तर यांनी धम्म तर केव्हाच त्यागला आहे पण आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ मोडीत काढून मरणघटिका मोजत असलेल्या काँग्रेसला पुनर्जीवीत करून आंबेडकरी चळवळीचे घरटे उध्वस्त करण्याचा खटाटोप यांनी चालवलेला आहे…
आता यांना पूर्वाश्रमीची ओढ लागलेली आहे.लवकरच यांची पुन्हा हिंदू धर्मात घरवापशी होऊ शकेल असा प्रवास चालू आहे….कारण लोकलज्जेस्तव एकदा लग्नात साधू साधू म्हटलं की पुन्हा गोवर्धन घाटावरच साधू साधू होतो. मध्ये कुठेच बुद्ध नसतो..आता फक्त *गर्व से कहो हम हिंदू हैं l* अशी घोषणा बाकी आहे. आप कमाईचा विसावा भाग वगैरे फार दूरची गोष्ट आहे….

मी आता घोषित करतोय की आंबेडकरी विचारधारेचा पक्ष मोडीत काढून जो कोणी माझा नातेवाईक इतर पक्षात हुजरेगिरी करीत असेल किंवा इतर पक्षाची हुजरेगिरी करणाऱ्या आंबेडकरी पक्षात काम करीत असेल त्या सर्व नातेवाईकांशी असलेले नातेसंबंध मी तोडून टाकीत आहे. या दलालांची माझ्या प्रेतवार सावली सुद्धा पडू देऊनये…

गणपत गायकवाड
9527881901

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *