मुखेड: प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती जिप्सी मॉर्निंग ग्रुप मुखेडचे सचिव श्री बालाजी तलवारे यांच्या निवासस्थानी गोपाळकृष्ण नगर उमरदरी येथे जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांसह उत्साहात साजरी करण्यात आली.
जिप्सी मॉर्निंग ग्रुप हा मुखेड शहरातील नावाजलेला मॉर्निंग वॉक ग्रुप आहे. जिप्सी मॉर्निंग ग्रुप मागील सुमारे पाच वर्षांपासून अत्यंत नियमितपणे सकाळी फिरायला जात असतो या ग्रुपचे ब्रीद वाक्यच आहे “प्रभाती फिरावे शतायुषी व्हावे.” या ब्रीद वाक्याप्रमाणे जिप्सी मॉर्निंग ग्रुप हा दररोज सकाळी फिरायला जात असतो व तसेच विविध सामाजिक उपक्रम, धार्मिक उपक्रम, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन, आरोग्य विषयी आरोग्य शिबिराचे आयोजन आपल्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने साजरा करत असतो.
दरवर्षी विविध कार्यक्रमे व वाढदिवस मोठ्या उत्साहात समाजात जाऊन मागील पाच वर्षापासून नित्यनेमाने साजरा करत असतो. या जयंतीप्रसंगी जिप्सी मॉर्निंग ग्रुप मुखेडचे संस्थापक अध्यक्ष दादाराव आगलावे, अध्यक्ष प्रा.जय जोशी, सचिव बालाजी तलवारे , कार्याध्यक्ष बलभीम शेंडगे, कोषाध्यक्ष वैजनाथ दमकोंडवार व सदस्य राजेश भागवतकर, सुरेश उत्तरवार, हाणमंत गुंडावार, सुरेंद्र गादेकर, नामदेव श्रीमंगले, माधव गुंडावार, पापासेठ चौव्हान, अशोक तलवारे, पांडूरंग दाडेराव, बाबूराव तांदळीकर, प्रा.शिवाजी पाडदे, कु.किंजल तलवारे, कु.प्रियल तलवारे, कु. रिया तलवारे व प्रग्यान तलवारे हे उपस्थित होते.