डॉ.अण्णाभाऊ साठे यांनी पिडित,वंचित, कामगार शोषितांचा दबलेला आवाज बुलंद केला; आमदार श्यामसुंदर शिंदे*…! आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह व अभ्यासिकासाठी दिला 15 लक्ष रुपयाचा निधी

 

लोहा: प्रतिनिधी

लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त लोहा शहरातील जुना लोहा येथे लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते डॉ.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, यावेळी सिनेअभिनेते तथा माजी सनदी अधिकारी अनिल मोरे ,शिवसेनेचे राज्य संघटक एकनाथ पवार,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पवार,बोरगावचे सरपंच प्रतिनिधी पुंडलिक पाटील,खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार,माजी नगरसेवक बबन निर्मले,माजी नगरसेवक संभाजी चव्हाण,माजी नगरसेवक केतन खिल्लारे,माजी नगरसेवक भास्कर पवार,माजी नगरसेवक उत्तम महाबळे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर पाटील,माजी नगरसेवक अनिल दाढेल ,सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील,अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग दाढेल, जयंती मंडळाचे अध्यक्ष श्याम दाढेल यावेळी उपस्थित होते,

यावेळी व्यासपीठावरून बोलताना आमदार शामसुंदर शिंदे म्हणाले की, लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून त्यांनी वंचित,पीडित, शोषितांचा आणि कामगारांचा दबलेला आवाज बुलंद करण्याचे महान कार्य केलेले आहे, त्यांच्या अनेक कादंबऱ्या व साहित्य आजच्या पिढीला सदैव प्रेरणादायी असून विद्यार्थी व तरुणांनी व सर्व समाजांनी अण्णाभाऊंचा त्याग व आदर्श डोळ्यासमोर ठेवून ध्येय साध्य करण्याचे आवाहन यावेळी आमदार शिंदे यांनी केले, जुना लोहा येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह व अभ्यासिका साठी 15 लक्ष रुपये चा निधी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी जाहीर केला व या भागातील महिला भगिनींना बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी होण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना असतील त्या मी लवकरात लवकर अंमलात आणणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी बोलताना दिली, या अगोदरही आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी जुना लोहा येथील डॉ. अण्णाभाऊ साठे येथील सभा मंडपाला दहा लक्ष रुपयाचा निधी दिला होता,

 

यावेळी लोहा समन्वय समिती सदस्य सिद्धू वडजे, शेकाप तालुका अध्यक्ष नागेश हिलाल, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य अशोक सोनकांबळे सह मोठ्या संख्येने महिला भगिनी, कार्यकर्ते, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, जयंती मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *