कंधार ; प्रतिनिधी
आमचा भारत देश कृषिप्रधान असल्यामुळे जागतिक स्तरावर हीच ओळख भारताचे मोठेपण सांगुन जाते.आणि माझ्या भारत मातेचे रक्षण माझा शूर सैनिक बांधव डोळ्यात तेल घालून सीमेवर तैनात असतो,त्यामुळेच भारताचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्रीजींची घोषणा होती जय जवान! जय किसान! देशाचा शूर वीर जवान आणि शेतकरी राजा यांचे कार्य अनमोल आहे म्हणून क्रांतिभुवन बहाद्दरपुरा,ता.कंधार या नगरीतील हरहुन्नरी कलावंत गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी यांनी सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार व राष्ट्रभक्त मित्र परिवाराच्या वतीने १० वर्षापूर्वी सुरु केलेला मन्याड-गोदावरी खोऱ्यातील रक्षाबंधन सणानिमित्त भारतीय सीमावर्ती भागात आपल्या परिवारापासून कोसोदूर राहून भारत मातेच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या शूर सैनिक बांधवांना मन्याड-गोदावरी खोऱ्यातील शालेय भगीनींच्या ३३३३ सदिच्छा व ३३३३ राख्या सोबत १५ फुटी महाराखी हा देशभक्तीच्या स्फूर्तिदायक उपक्रमातुन ए.पी.ओ २६२ रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर चंदन कुमारजी व सुभेदार अमरसिंहजी साहू आणि हवालदार शिवहारजी कागणे भोजुचीवाडीकर यांच्या बटालियनकडे रवाना होणारी १५ फुटी महाराखी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार,विद्रोही विचारवंत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांचा समर्थ हस्ते अत्तरगंध महाराखीला लावून सीमेकडे रवाना होत असे त्यांच्या पश्चात त्यांच्या क्रांतिज्योत ज्ञानसागर शक्तीपीठ येथे विमोचन करण्यात येते.यंदा शेतकरी कामगार पक्षाच्या ७६ व्या वर्धापन दिनी लाल बावटाचे ध्वजारोहण झाल्यानंतर श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार संस्थेचे सहसचिव अँड मुक्तेश्वर केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या समर्थ हस्ते विमोचन करण्यात आले.त्या प्रसंगी भारत मातेचा गजर करण्यात आला.
बहाद्दरपूरा ग्राम पंचायतीचे माजी सरपंच माधवराव पेठकर सर व शिवाजीराव ऐनवाड सर,प्रा.डाॅ.प्रकाशराव डोम्पले सर,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बळीराम पेठकर, माजी उपसरपंच पंडितराव पेठकर व विद्यमान ग्राम पंचायत सदस्य गुरुनाथराव पेठकर,आदर्श शिक्षक परशूराम धोंडगे, माजी कलाध्यापक दुर्गादासजी विश्वासराव, साहेबराव शिनगारे,प्रदीप धोंडगे,नारायण उदगीरवाड, तुळशीराम गायकवाड, बालाजी परोडवाड,संजय शेकापूरे, बाळू सोळंके,सतिश गायकवाड बाबन लखेरे आदीजण उपस्थित होते.