कंधार ; प्रतिनिधी
आमचा भारत देश कृषिप्रधान असल्यामुळे जागतिक स्तरावर हीच ओळख भारताचे मोठेपण सांगुन जाते.आणि माझ्या भारत मातेचे रक्षण माझा शूर सैनिक बांधव डोळ्यात तेल घालून सीमेवर तैनात असतो,त्यामुळेच भारताचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्रीजींची घोषणा होती जय जवान! जय किसान!देशाचा शूर वीर जवान आणि शेतकरी राजा यांचे कार्य अनमोल आहे म्हणून
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा,ता.कंधार या नगरीतील हरहुन्नरी कलावंत गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी यांनी सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार व राष्ट्रभक्त मित्र परिवाराच्या वतीने १० वर्षापूर्वी सुरु केलेला मन्याड-गोदावरी खोऱ्यातील रक्षाबंधन सणानिमित्त भारतीय सीमावर्ती भागात आपल्या परिवारापासून कोसोदूर राहून भारत मातेच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या शूर सैनिक बांधवांना मन्याड-गोदावरी खोऱ्यातील शालेय भगीनींच्या ३३३३ सदिच्छा व ३३३३ राख्या सोबत १५ फुटी महाराखी हा देशभक्तीच्या स्फूर्तिदायक उपक्रमतील राख्या व सदिच्छापत्र सोबत १५ फुटी महाराखी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.अभिजित राऊत यांच्या समर्थ हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथून भारतीय सीमेवरील सैनिकांना दि.०६ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय डाक विभागामार्फत ए.पी.ओ २६२ रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर चंदन कुमारजी व सुभेदार अमरसिंहजी साहू आणि हवालदार शिवहारजी कागणे भोजुचीवाडीकर यांच्या बटालियनकडे रवाना होणार आहे .