वंचितांच्या अंधार वाटेवरील सूर्यपुत्राचा भीमप्रकाश* भाग दहावा

 

शेकडो राजेंराजवाडे ज्याचे शिष्य आहेत असा शास्ता तथागत भगवान बुद्ध खापराच्या भिक्षा पात्रात भोजन करतात आणि आपण सोन्या चांदीच्या ताटात भोजन करतो या गोष्टीचे एका राजाला वाईट वाटले. तो म्हणाला आपण तथागतांना सोन्याचे भिक्षा पात्र भेट म्हणून दिलं पाहिजे. लगेच तो सोनाराकडे गेला आणि सोन्याचे भिक्षा पात्र बनवून तथागताना अर्पण केलं. ते पाहिलं एका चोराने. त्या चोराच्या मनात लालसा निर्माण झाली आणि तो चोर तथागतांचा पाठलाग करू लागला….. तो थेट गंधकुटीपर्यंत पोचला. तथागता सोबत भिकूसंघ
असल्यामुळे चोराची पंचाईत झाली. रात्र कधी होते, भिक्कू कधी झोपतील याची तो वाट पाहू लागला
मध्ये मध्येच डोकावून पाहू लागला. स्वतः झोपत नाही आणि इतरांनाही झोपू देत नाही. हा चोर इथे कशासाठी आलेला आहे हे तथागतांच्या लक्षात आले. ज्याने हजारो एकर जमीन, तीन ऋतुतील तीन महाल, करोडोचे जड जवाहीर असे राजवैभव ठोकारले त्याला अशा भिक्षा पात्राचा काय मोह असणार?त्यांनी ते सोन्याचे भिक्षापात्र उचलले आणि बाहेर अंगणात आणून ठेवले… चोर खुश झाला आणि पात्र घेऊन उड्या मारत निघून गेला…. तथागत राजगृह त्यागून अनासक्त राहिले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजगृहात राहूनही अनासक्त राहिले. 1957च्या लोकसभेत निवडून जाण्याची खात्री असतानाही मी बौद्ध आहे राखीव जागेवरून लढणार नाही असे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर म्हणाले आणि चालून आलेली खासदारकी नाकारली… त्या सूर्यपुत्राच्या सुपुत्राने चालून आलेले मंत्रिपद नाकारले. ज्यांना पदाचा मोह होता ते मंत्रिपद घेण्यासाठी उड्या मारत वाड्यावर गेले.आमचे पाकीटमार टमरेल विचारवंत म्हणतात *प्रकाश आंबेडकर काँग्रेस ने देईल त्या एक दोन जागा घेऊन काँग्रेसला सपोर्ट केला पाहिजे. ज्यांची अख्खी हयात काँग्रेस पुढऱ्यांची हुजरेगिरी करण्यात गेली, ज्यांनीभारिपला एका रुपयाची मदत ना करता अक्खा पगारचा पगार बामसेफला दान केला ते लोक आज म्हणतात प्रकाश आंबेडकर यांनी चाळीसवर्षात काय केलं. एकदा म्हणतात रिपब्लिकन पक्षवाले एका सिटसाठी काँग्रेस सोबत युती करतात. एकदा म्हणतात काँग्रेस सोबत गेले असते तर स्वतः तरी संसदेत पोचले असते. आता एकटे सत्तेत गेलेले आजपर्यंत काय काय दिवे लावले हे आपण पाहत आलेलो आहोत .आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचा निर्णय झाला डझनाने आमदार आणि डझनाने मंत्री असणारे संसदेत तोंड उघडत नाहीत आणि हे विचारवंत म्हणतात आता घर पेटलं असताना तुमचे प्रकाश आंबेडकर काय करत आहेत?
साधी गोष्ट आहे, ज्याला तुम्ही संविधानाचे संरक्षक म्हणून निवडून दिले ते वर्गीकरणाचे पाहून घेतील

वर्गीकरणाचा प्रश्न एकदा बाळासाहेबांनी हाणून पडला होता. पुन्हा एकदा ते काळा कोट चढवतील. जेव्हा समाजाला गरज पडेल तेव्हा ते धावून येतात. कोरोना काळात सारे घरात दडून बसले होते वंचित समूहातील ज्यांचे पोट हातावर आहे अशा कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असता कोणत्याही संकटाची पर्वा न करता बाळासाहेब आंबेडकर घरा बाहेर पडले लोकांना हिंमत दिली न्हावी समाजाची बंद पडलेली चूल पेटविली. छोट्या छोट्या व्यवसायीकाचा व्यवसाय सुरु करून दिला. हे विचारवंत म्हणाले बघा तुमचा प्रकाश आंबेडकर मंदिर उघडा म्हणून आंदोलन करत आहे…
प्रत्येक गोष्टीत ज्यांना मलाई खाण्याची सवय जडली आहे त्यांना वंचिताचे दुःख कसे कळणार?
कोरोना काळात बाळासाहेब घराबाहेर पडले नसते तर अनेकांचा संसार उघड्यावर पडला असता. बाळासाहेब घराबाहेर पडले आणि हजारो कष्टकऱ्यांच्या घरी चुली पेटल्या… पंढरपूरात बाळासाहेब काही देवदर्शनाला गेले नव्हते तर माणसातला देव उपाशी मारतोय त्याच्या भाकरीची सोय करण्यासाठी बाळासाहेब पंढरपूरला गेले होते हे आमच्या विचारवंत मंडळीला कोण सांगावं?

एक विद्वान म्हणाले बाळासाहेबांचे राजकारण दिशाहीन झाले. आता टमरेलांना कसे सांगावे? बाळासाहेब आंबेडकर obc आरक्षणाचा मुद्दा घेऊन वंचितांना सत्तेत वाटा मिळऊन देण्यासाठी राजकारणात आले आणि आजही ते obc च्या आरक्षणासाठी वंचितांना सत्तेत भागीदार बनविण्यासाठी भर पावसात महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. काल नांदेड येथे आरक्षण बचाव यात्रा आली असता गुडघाभर चिखलात हजारो लोक बाळासाहेब आंबेडकर यांचे भाषण ऐकण्यासाठी गर्दी केली होती. obc मायक्रो obc आपापल्या पारंपरिक वेशभूशेत उपस्थित होते. विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून विश्राम गृहावर अनेकांच्या रांगा लागलेल्या होत्या. कोणतेही सत्तेचे वलय नसताना लाखोची गर्दी खेचून आणणारा नेता म्हणून बाळासाहेबांचे नाव विरोधक ही घेतात. एकीकडे रोज 500 रुपये देऊन ही अनेकांच्या सभा ओसपडतात आणि इथे पदारमोड करून घरच्या भाकरी खाऊन लाखाच्या सभा होतात हा एक चमत्कार आहे.
बाळासाहेब म्हणाले होते *मी मृत्यूच्या दारात जाऊन परत आलोय. मला जिंकत आलेली लढाई हारायची नाही*

त्यासाठी ते मोर्चे बांधणी करत असताना आमची रिटायर्ड गँग फतवे काढण्यात गुंग होती. अख्या आयुष्यात काही चांगले काम करता ना आलेले आता आयुष्याच्या सांजवेळी ही बालिशपणाचे प्रदर्शन करून हातात आलेले यश मातीत मिसळविण्याचे काम केले….
मित्रानो आता पुन्हा हे वाड्यावरचे सालगडी तुमच्या दारात येतील आणि काँग्रेसची चापलुसी करतील. त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका…. जे लोक स्वतःचे कुटुंबाला स्वतःच्या मुलांना वळण लावू शकले नाहीत ते समाज हिताच्या गोष्टी कोणत्या तोंडाने करतात?

गणपत गायकवाड नांदेड
9527881901

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *