नांदेड -( दादाराव आगलावे)
योगऋषी श्री रामदेव बाबा यांच्या पतंजली योगपीठ हरिद्वार अंतर्गत देशभर सुरुवात करण्यात आलेल्या ” हर घर योग” या योजनेचा मोठ्या थाटात नांदेड येथे पतंजली योगपीठ अंतर्गत चालणाऱ्या नित्ययोग भक्ती लॉन्स तर्फे येत्या रविवारी दिनांक 11 ऑगस्ट रोजी नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा साहेब चे मुख्य पुजारी संत बाबा कुलवंत सिंगजी यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात येणार आहे.
पतंजली योगपीठ हरिद्वार अंतर्गत देशभरात अनेक राज्यात ” हर घर योग ” या योजनेचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. या अनुषंगाने पतंजली योगपीठ अंतर्गत मालेगाव रोडवरील भक्ती लॉन्स येथे गेल्या सात महिन्यापासून मोफत चालणाऱ्या नीत्य योग शाखेतर्फे या योजनेचा शुभारंभ सचखंड गुरुद्वारा श्री हुजूर साहेब चे मुख्य पुजारी संतबाबा श्री कुलवंत सिंगजी यांच्या हस्ते दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या थाटात करण्यात येणार आहे. सचखंड गुरुद्वारा हुजूर साहेबचे मुख्य पुजारी संत बाबा कुलवंतसिंगजी यांच्या हस्ते होणार “हर घर योग” योजनेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती
योग गुरु योगाचार्य सितारामजी सोनटक्के यांनी दिली.
याबाबत नांदेड येथील गुरुद्वारात संत बाबा कुलवंत सिंगजी यांची नित्य योग समिती भक्ती लॉन्स यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या योजनेचे परिपत्रक देण्यात आले. त्यांनी या योजने ची प्रशंसा करत 11 ऑगस्टला शुभारंभ करण्यास अनुमती दिली आहे.
वसमत गुरुद्वाराचे माजी व्यवस्थापक तथा कार सेवक हुकुमसिंगजी यांनी याबाबत विशेष पाठपुरावा केला आणि गुरुद्वाराचे सहाय्यक अधीक्षक शरणसिंग सोडी यांनाही परिपत्रक देऊन या योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली.
याप्रसंगी पतंजली नित्य योग समिती भक्ती लॉन्सचे अध्यक्ष योगाचार्य सिताराम सोनटक्के, उपाध्यक्ष सदाशिवराव बुटले पाटील, आंतरराष्ट्रीय योग पटू किशोर भवर, कार्यवाहक व प्रसिद्धीप्रमुख मकरंद पांगरकर, गुरुद्वाराचे माजी व्यवस्थापक हुकूम सिंघ आदींची उपस्थिती होती.