तेवीसावी व चोविसावी अमरनाथ यात्रा तसेच पंधरावी व सोळावी चारोधाम यात्रा यशस्वी झाल्या प्रित्यर्थ धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी महाप्रसाद ग्रहण केला असून यावेळी तेवीसाव्या अमरनाथ यात्रेमध्ये अन्नदान करणाऱ्या अन्नदात्यांचा, भाऊचा माणुसकीचा फ्रिज, लायन्सचा डबा, क्षुधा शांती या उपक्रमातील दानशूर नागरिकांचा तसेच अमरनाथ यात्रेला विस्तृत प्रसिद्धी देणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा यथोचित सत्कार करण्यात आला.
स्वामी समर्थ मंदिर, सोमेश कॉलनी नांदेड येथे शनिवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे अनेकांनी हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा सल्ला दिला. परंतु दिलीप ठाकूर यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवून कार्यक्रम करण्याचा निश्चय केला.सुदैवाने शनिवारी पाऊस न पडल्यामुळे महाप्रसादा मध्ये कोणताही व्यत्यय आला नाही. जयश्री व दिलीप ठाकूर यांच्या हस्ते सकाळी अभिषेक व दुपारी महाआरती करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.दिलीप ठाकूर यांनी विक्रमी तब्बल २४ वेळा अमरनाथचे,२७ वेळा वैष्णोदेवीचे आणि २९ वेळा अमृतसर येथील सुवर्णंमंदिराचे दर्शन घेतल्याबद्दल
डॉ.रमेश नारलावार शशिकांत पाटील, गणेश कोकुलवार, महेश देबडवार,विकास परदेशी,राजेश देशमुख,उमेशगुरु तळणकर, बालूमहाराज वैष्णव यांनी सत्कार केला.हृदयनाथ सोनवणे,नागेश शेट्टी,रेखा भताने,डॉ.द्वारकादास नखाते,केदार मालपाणी,डी.एच.अग्रवाल,
अनंतराव कवठेकर,सुभाष वलबे,रामेश्वर वाघमारे, प्रदीप माळेगावे, आनंद साताळे,अपर्णा कुलकर्णी,अमरनाथ शिखरे पाटील,प्रफुल्ल नागरगोजे,सुरेखा रहाटीकर,बालाजी जाधव
यांनी अमरनाथ यात्रेत अन्नदान केल्याबद्दल त्यांचा एक मुखी रुद्राक्ष, मोत्याची माळ देऊन सन्मान करण्यात आला.दिलीप ठाकूर यांच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभागी होणारे ॲड.बी.एच.निरणे,सतीश शर्मा, बलवीरसिंह ठाकूर,रवी कडगे,प्रा. लक्ष्मी पूरणशेट्टीवार, तुकाराम इंद्राळे,शिवा शिंदे,शिवाजी पाटील, आनंदीदास देशमुख, शंकर परकंठे, जगदीश आसवा, राजू मोरे, जयंतीलाल पटेल, नीता दागडिया, रवी पोतदार,अतुल बियानी,स्नेहलता उत्तरवार, प्रिया चौधरी,प्रगती निलपत्रेवार यांना गौरविण्यात आले.अनिलसिंह हजारी, संतोष परळीकर, गोपाळ माळगे,मारोती कुमार, वैशाली देबडवार, प्रणिता देशमुख या भाजप पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार सुनील मुळे, रमेश देवडे, शीलरत्न लोखंडे, कैलास जाधव यांच्यासह अनेक माध्यम प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.सुगनचंदजी शर्मा,बलभीम पत्की,शशिकांत कुलकर्णी,कल्याण शिरसीकर अशोक गरुडकर,राजू बच्चेवार,डॉ.अरुण हिवरेकर,मुकेश पटेल,योगेश पटेल,
एकनाथ ब्राह्मणवाडेकर, नारायणसिंग चौहान , पद्माकर केंद्रे, प्रा.हवगीराव साताळे, एन. एन.भालेराव, हनुमानसिंह चौहान,विजयसिंह चौहान,डॉ.सतीश चौहान,इंगळे,दिलीप माने, डॉ.विलास चाटे,बालाजी बामणे ,भास्कर स्वामी, साईनाथ पदमवार, गणेश आरुटवार, संतोष पालेकर यांच्यासह शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी समर्थ मंदिराचे हेमंत गिते,राजेशसिंह ठाकूर, प्रकाश उंटवाले, जगतसिंह ठाकूर, संतोष बच्चेवार, सुभाष देवकते,सुरेश शर्मा,कैलाश महाराज, सुरेश निलावार,विजय वाडेकर,अर्जुनसिंह ठाकूर,अशोक साखरे,राजेश यादव,रिंकू सावळे,शुभम येडके यांनी परिश्रम घेतले.