क्युकी हर एक फ्रेंड जरूरी होता है….
मित्रांच्या बाबतीत मी सगळ्यात श्रीमंत हे मी अनेकदा लिहीलय.. अनेकदा यावर बोललेय सुध्दा.. माझ्याकडे काय आहे माहित नाही पण एकदा जवळ आलेली व्यक्ती माझ्यापासुन दुर जात नाही.. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे..
आज फ्रेंडशिप डे आहे आणि दीपअमावास्या सुध्दा आहे.. माझा क्लोज फ्रेंड माझा नवरा त्यामुळे त्याला फ्रेंडशिप बॅंड बांधून दिवसाला सुरुवात करणार आहे… आमचा लाईक माइंडेड मित्रांचा जवळपास १४ वर्षे जुना गृप आहे .. आम्ही आणि आमची फॅमिली एकमेकांना ओळखतो.. शेअरिंग केअरींग होत असतं… मी रुसते.. भांडते आणि प्रेमही करते त्याहीपेक्षा जास्त सगळे मला सांभाळतात.. काळजी घेतात.माझ्यावर प्रेम करतात.. एकत्र ब्रेकफास्ट. आम्ही . ड्रींकसाठी एकत्र कधीही येत नाही.. . गृपमधे एकही स्मोक करत नाही.. पबला जात नाही.. पिकनीक करतो.. कॉफी डेट करतो.. कधी माझ्या घरी पार्टी तर कधी फोटोशुट…, चेष्टा, मस्करी , दंगा सगळं सुरु असतं.. त्यात अनेक बिझनेसमन आहेत.. नोकरी करणारे आहेत.. रीटायर आहेत काही कलाकार आहेत..
एक किस्सा सांगते , महिन्याभरापुर्वी एका मित्राने मला रील करुन दिलं होतं आणि त्यासाठी माझ्या एका मित्राने पाहिले न मी तुला हे गाऊन पाठवलं होतं .. मी माझ्या मित्राने गायलेलं गाणं न घेता ओरीजनल सॉंग घेतलं आणि मग काय…????.. तुम्हीच कल्पना करा.. त्यासाठी मी शिक्षा भोगावी अशी त्याची अपेक्षा होती.. मी मान्यही केलं.. मला वाटलं एखादी पार्टी द्यावी लागेल अगदी सोप्पं आहे
.. पण कसलं काय त्याने गृपवर मेसेज केला कि सोनल हे सहज करु शकते. ओळखा ??मग म्हणाला , सचिन जी घरात नसताना आणि मी तिथे असताना किवा नसताना हे ती करु शकते.. अहो तुम्हाला सांगते , नको नको ते डोळ्यासमोर येउन गेलं.. कोणालाही काहीही ओळखता येइना..चार दिवसाने भेटल्यावर तो म्हणाला , माझ्या आवडीचं हे गाणं तु स्टारमेकर वर गायचं ..
मी कपाळाला हात लावून बसले कारण गाणं आणि मी ??.. नो वे.. त्याला म्हटलं हे सोडून काहीही माग यार.. त्याने हट्टच केला त्यामुळे आम्ही दोघांनी ट्राय पण केलं .. आता पुढे काय लिहु ??.. तुम्ही कल्पना करा .. इतकं वाईट या जगात कोणी गात नसेल.. पुढे जाऊन त्याचा आत्मविश्वास पहा.. तो म्हणतो , तु उत्तम गाऊ शकशील.. प्रेम असावं अगदी ते आंधळही असावं पण ते बेसूर नसावं नारे..हाहाहा..
आमच्या गृपचे काही नमुने आणि किस्से सांगते तेही फक्त विनोदी अंगाने .कॉफी म्हणजे खरं तर बहाणा ..एक कप कॉफी पिताना तासभर गप्पा असा त्याचा अर्थ पण आमचे दोन मित्र कॉफी समोर आली की तोंडाला लावतात आणि संपवुन कप खाली ठेवतात त्याला आम्ही कॉफी शॉट म्हणून हसतो.. आणि त्याविरुद्ध मी आणि एक मित्र एक जामुन शॉटवर एक तास गप्पा मारतो.. एक मित्र जे समोर येइल ते कधीही आणि कितीही वेळा खातो त्याला मी कायम म्हणते, मी राक्षसासोबत मैत्री केलेय.
एकाला स्वच्छता आणि टापटीप राहायची इतकी आवड की पायाला वाळु लागते म्हणुन तो समुद्राच्या पाण्यात पाय ठेवत नाही.. एकजण प्रचंड माणूसघाणा तर दुसऱ्याच्या हातून कपभर चहाही सुटत नाही.. मला खुप माणसं हवी असतात.. त्यांना खायला घरी बोलवायचं असतं. सगळ्याचे वाढदिवस साजरे करायचे असतात.. फिरायचही असतं .. कामही करायचं असतं.. पण माझ्याकडे मित्रांची अशी व्हरायटी आणि त्यातून प्रत्येकजण माझ्यासाठी काहीना काही सतत करत असतो… आजही आम्ही सगळे ब्रेकफास्टला भेटणार आहोत.. एका मित्राने सगळ्यासाठी ब्रेकफास्ट ठेवलाय.. मीही काही सरप्रायजेस रेडी केली आहेत.. खरं तर असे मित्र असायला भाग्य लागतं.. जे सगळ्याच्या नशीबी नसतं.. ज्याच्याकडे आहेत त्यांनी जपा कारण ते मौल्यवान आहे.. क्युकी हर एक फ्रेंड जरूरी होता है.
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist