समाज आणि शासन या मधील महत्वाचा दुआ म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी,नांदेड या पदावर कार्यरत असलेल्या विद्याताईंचा जीवनप्रवास म्हणजे संघर्षाने,स्वकर्तृत्व सिध्द करत गाठलेला एक मोठा पल्ला.समस्त स्त्रीवर्गाला प्रेरणादायी आहे.जन्मदात्री गयाबाई यांचे प्रोत्साहान त्यांना नेहमीच मिळत गेले घरात पाच भावंड,परिस्थीती बेताची,आपली परिस्थीती बदलायची हे स्वप्न डोळ्यात जपत त्यांनी आपले ध्येय साकार केले.प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर काहीही साध्यकरता येत याच मुर्तिमंत उदाहरण म्हणजे विद्या संभाजी आळणे.आज त्या सर्व नांदेडकरांना सुपरिचीत असलेलं व्यक्तीमत्व आहेत.
मुळातच त्या स्त्रीवादी कार्यकर्ती,स्त्रीयांवर होणा-या अत्याचाराची त्यांना प्रचंड चीड!तेवढ्याच हळव्या आणि मृदूभाषी,मनाने प्रेमळ असलेल्या नेहमीच कर्तव्यदक्ष राहून एका तपापेक्षा जास्त बालसंरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य त्या करत आहेत.या मध्ये बालविवाह,दत्तक विधान,तृतीयपंथीयांना सन्मानाची वागणुक मिळावी या साठी कार्यरत,नकोशी,अनाथ बालकांना पालक मिळवून देऊन त्यांच्या अंधकारमय जीवनात प्रकाशाची वाट दर्शविण्यासाठी त्या प्रयत्नरत असतात,तसेच पाॅक्सी प्रकरणातील बालकांना न्याय मिळवून देण्याचे महत्वाचे कार्य त्या करत असतांना बालकांना मायेची ऊब देतात.मुलांवर होणारी हिंसा,लैंगीक अत्याचार रोखण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात.त्यांच्या काळजातील अपार माया,दयाभाव त्यांच्या चेह-यावर झळकत असतो.बाल मजुरी विरोधात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे,लहान मुलं ही निष्पाप,निरागस असतात,त्यांना त्यांच बालपण हसत खेळत उपभोगण्याचा हक्क आहे,बालपणीच्या हिंसाचाराचा बाल मनावर खुप गंभीर परिणाम जाणवत असतो,त्यासाठी बालकांचे बालपण जपले पाहिजे त्यांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणुण सुजाण नागरिक घडवणे हे प्रत्येकपालकांचे कर्तव्य आहे असा त्यांचा अट्टाहास असतो.
दहावी झाल्यावर त्यांचा बालविवाह झालेला,त्यातुन आलेल्या असंख्य अडचणी काय असतात,हे त्यांनी अनुभवल!माझ्या वाट्याला जे आलं ते इतर मुलींच्या नशिबी येऊ नये,या साठी त्या धडपड करत असतात.या साठी काय करता येईल ते त्या करत असतात.विविध शासकीय यंत्रणा”चाईल्ड लाईन १०९८”च्या माध्यमातुन आजपर्यंत अनेक बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे.याच त्यांना समाधान वाटत.बालविवाह मुक्त बालीकांचे या माध्यमातुन पुनर्वसन करण्याचे महत्वाचे कार्य त्यांच्या हातुन झाले आहे.
समाजात वावरतांना अनेक अनुभव येतात,काही वेळा समोरची परिस्थीती पाहुन मन खीन्न होत.गंभीर परिस्थीतवर मात करत जगणं हे एक मोठं आव्हान आहे अस त्या म्हणतात.
कोरोना काळात एक पालक व दोन पालक कोव्हीड-१९ मध्ये गमावलेल्या बालकांना विविध योजनांचा लाभ आणि आर्थिक मदत देण्याचे अत्यंत महत्वाचे काम त्यांच्याहातुन झाले आहे.त्याचप्रमाणे कोरोनाकाळात पती गमावलेल्या स्त्रीयांना विविध शासकीय योजनांचा लाभ आणि आर्थिक मदत देण्याचे कार्य देखील घडले आहे.अत्यंत बिकट परिस्थीती माणूस माणसाच्या जवळ यायला घाबरत होता,खरं,तर या काळात माणुसकीच हरवली होती,पण त्यांच्या सर्व स्टाॅफने अत्यंत मोलाचे सहकार्य त्यांना करत कर्तव्य बजावले.सर्वजण घरात बसलेले असतांना विद्याताई मात्र आपल्या सहकारी कर्मचा-यांच्या सहकार्याने कोरोना परिस्थीतीवर मात करण्यासाठी तत्पर होत्या,हे सर्व सहका-यांनी दिलेल्या हिम्मतीमूळे आणि माझे मनोबल वाढविल्यामूळे शक्य झाल्याचे ते प्रांजळपणे मान्य करतात
कोरोनाने मला जगायला शिकवलं असं त्या म्हणतात,एका श्वासाची कींमत काय असते हे विद्याताईने जवळून अनुभवलं,कोरोनाची लागणं त्यांनाही झाली होती,पण हिम्मत न हारता त्यांनी इतरांना पण हिम्मत दिली हे त्यांच्यातील स्त्रीशक्तीचं रुप यावेळी नांदेडकरांना पाहायला मीळालं.त्या काळात ड्युटी करतांना खुप चांगले आणि वाईट अनुभव आले,जे मी आयुष्यात कधीच नाही विसरु शकत असे त्या म्हणतात.कुटुंब आणि नौकरी सांभाळतांना तारेवरची कसरत होत असली तरी,यात वेगळचं समाधान आहे.घरच्यांचे खुप पाठबळ आहे.त्यामुळे मी हे सर्व साध्य करु शकते.
हर्षदा आणि श्रध्दा दोघीपण इंजिनिअर असलेल्या गोजी-या लेकीची त्या आई आहेत याचा त्यांना अभिमान वाटतो.दोन्ही मुलींनी माझ्या आयुष्यात सुखाचे क्षण पेरले आहेत,म्हणून प्रत्येक घरात एक तरी मुलगी हवीच.बेटी बचाव,बेटी पढाव याच त्या समर्थन करतात.महिलांनी कीतीही संकट आली तरी,घाबरुन जाऊ नये,आपल्यातील आंतरीक शक्ती जागृत करत आहे त्या परिस्थीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली तरच प्रत्येक महिला सुरक्षीत राहिल आणि तीला इतरांच्या मदतीची गरज लागणार नाही.
नोबेल पारितोषिक विजेते मा.श्री.डाॅ.कैलास सत्यार्थी यांना ते आपले प्रेरणास्थान मानतात.कुशाग्र बुध्दिमत्ता लाभलेल्या विद्याताईंचा
मराठी,हिंदी,इंग्लीश,आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व आहे.त्यांचे शिक्षणही भरपुर झालेले.तब्बल अकरा पदवी त्यांच्याकडे आहेत आणि विशेष म्हणजे त्या अजुनही शिकत आहेत.हे खुप कौतुकास्पद आहे.त्यांच्या मध्ये एक उत्तम लेखीका,आदर्श आई,पत्नी आणि एक गोड मैत्रीण दडलेली आहे.माणसं जोडणं त्यांना आवडत.आणि त्यांच्या स्वभावामूळे अनेक चांगली माणसं त्यांच्या सानिध्यात आहेत.यालाच ती आपली श्रीमंती मानतात.
विद्याताईंचा ५ आॅगस्ट हा जन्मदिवस.स्वता:च बालपण जबाबदारीच्या ओझ्याखाली करपलेलं असतांना त्या इतरांच बालपण समृध्द करण्यासाठी जीवाच रान करतात,खरचं,विद्याताई तुमच्या विषयी खुप अभिमान वाटतो.समस्त स्त्रींयासाठी तुम्ही प्रेरणास्त्रोत आहात,सलाम तुमच्या कार्याला!आपल्या हातुन असेच समाजकार्य घडत राहो,हीच अपेक्षा.कौतुक भरल्या शब्दसुमनांसह आपणास उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१