(कंधार ; दिगांबर वाघमारे )
कंधार पंचायत समितीच्या विविध विभागांत नेहमीच अभ्यासू व गुणवान अधिकारी सातत्याने नियुक्त होत असतात. आपल्या कर्तव्यपरायण आणि अभ्यासू वृत्तीने ते कार्यातून इतरांना प्रेरणा देत असतात. सध्या गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कंधार अंतर्गत बीट उस्माननगरचे उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी मा.वसंत मेटकर हे सुद्धा त्यापैकीच एक व्यक्तिमत्त्व आहे.
मा.वसंत मेटकर यांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या विषयांच्या पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत. त्यांनी एम.ए.(मराठी) या विषयात राष्ट्रीय पात्रता परीक्षा,(नेट)परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. त्यानंतर त्यांनी एम.ए.(शिक्षणशास्त्र) व एम.ए.(मराठी), या विषयात (सेट) परीक्षा उत्तीर्ण करून वेळोवेळी आपली पात्रता सिद्ध केलेली आहे.
यावर्षी यु.जी.सी.मान्यता प्राप्त सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे आयोजित राज्यस्तरीय पाञता परीक्षा (सेट) दि.७ एप्रिल २०२४ मध्ये घेण्यात आलेली होती,सदरील परीक्षेत शिक्षण विस्तार अधिकारी श्री.वसंत मेटकर यांनी एम.एस.डब्लू(समाजकार्य) या विषयाची राज्य पात्रता परीक्षा,(सेट) परीक्षा उत्तीर्ण करून पुन्हा एकदा तिहेरी (हॅटट्रिक) यश मिळवत, आपली बौद्धिक योग्यता सिद्ध केलेली आहे. यासाठी त्यांना गटशिक्षणाधिकारी मा.संजय येरमे सरांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभलेले आहे.
शिक्षणक्षेत्रातील एका ज्ञानजिज्ञासू अधिकाऱ्याने चिकाटी,मेहनत, व अथक परिश्रमाच्या माध्यमातून प्राप्त केलेले यश, हे नेहमीच शिक्षण क्षेत्रातील कार्यरत असलेल्या शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी यांना प्रेरणादायी असते, म्हणून राष्ट्रीय पात्रता परीक्षेसह, राज्य पात्रता परीक्षेत तिहेरी यश मिळवणारे मा.वसंत मेटकर यांचे पंचायत समिती कंधार अंतर्गत सर्व केंद्रप्रमुख,सर्व मुख्याध्यापक,व सर्व शिक्षकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.