कंधार :प्रतिनिधी:
कंधार तालुक्यातील मौजे मंगलसांगवी येथे लोहा-कंधार मतदार संघाची लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या निधीतून महादेव मंदिर सभागृहाचे लोकार्पण काल दि. 07 ऑगस्ट रोजी शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ .आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी सर्वप्रथम आशाताई शिंदे यांनी शि.भ.प. शिवानंद महाराज दापशेडकर यांच्या कीर्तनास उपस्थित राहून शिवानंद महाराज दापशेडकर यांचा आशीर्वाद घेतला, यावेळी बोलताना आशाताई शिंदे म्हणाल्या की, लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी मतदारसंघातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली अनेक कामे व नवीन विविध विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंत्रालय स्तरावरून मंजूर करून आणून मतदारसंघाचा कायापालट केला .
जवळपास गेल्या अनेक वर्षापासून ही विकास कामे प्रलंबित होती, हीच कामे आमदार शिंदे यांनी पाच वर्षाच्या काळात पूर्ण केलेली असून लोहा-कंधार मतदारसंघाला सुजलाम सुफलाम करून मतदारसंघात हरितक्रांती करण्याचा मानस आमदार शिंदे यांचा असून मतदारसंघाला मराठवाड्यात लोहा कंधार मतदारसंघ एक आदर्श विकासाभिमुख मॉडेल मतदारसंघ बनवण्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे व माझे स्वप्न असून हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आमदार शिंदे साहेब व मी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी आशाताई शिंदे यांनी बोलताना दिली,
यावेळी गावकऱ्यांच्या वतीने आशाताई शिंदे यांचा भव्य फटाक्याची आतिषबाजी करून व शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन भव्य सत्कार करण्यात आला, यावेळी कंधार बाजार समितीचे संचालक रोहित पाटील शिंदे, शेकापचे जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर ,ओमराजे शिंदे, नारायण सावकार कुंभारे, दत्ता कौशल्ये ,डिके कांबळे ,प्रदीप हुंबाड,नागोराव कदम, व्यंकटराव कौशल्ये ,विशाल कौशल्ये ,गंगाधर पवळे, शिवराज शिंदे सह महादेव मंदिर समितीचे अध्यक्ष संतुकराव मुपडे सह कार्यकर्ते, पदाधिकारी, गावकरी, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.