आयुष्य सुंदर आहे की अडचणीनी भरलेले आहे ??..
मी रोज माझा रिॲज म्हणुन नवनवीन विषयांवर लिहीते आणि शेअर करते..जिथे तिथे माझे वाचक भेटतात आणि त्या विषयांवर माझ्याशी मोकळेपणाने चर्चा करतात .. त्यांची एखाद्या घटनेकडे पहाण्याची दृष्टी आणि माझी विचार करण्याची पध्दत यात खुप तफावत जाणवते कारण एकच असतं , आपण त्या घटनेकडे काय म्हणुन पहातो.. कारण या जगात काहीही आणि कोणीही वाईट नाही .. जसं ॲंगल चुकला की फोटो , व्हीडीओ / संपूर्ण फिल्म खराब होते त्याचप्रमाणे आपल्या विचाराचा ॲंगल चुकला की आयुष्य खराब होते..
काल संध्याकाळी मला भेटलेल्या वाचक यांना मी जवळपास २० वर्षे ओळखते… त्यांच्या लग्नाला ३० वर्षे उलटुन गेली तरीही आजही नवरा रिस्पेक्ट करत नाही म्हणुन दुखी आहेत.. आदर हा समोरच्यकडुन मागायचा असतो की स्वाभिमानाने मिळवायचा असतो ??.. या प्रश्नाचं उत्तर ज्याला मिळाला तो सुखी झाला.. या नात्याना आणि विचारांना अनेक पैलु आहेत.. सगळ्यात आधी येतं आपलं कर्म.. आधीच्या जन्मात आपण त्या व्यक्तीसोबत कसं वागलो यावर आता ती कशी वागणार हे अवलंबून असतं.. जे घडणार आहे ते आता बदलू शकत नाही पण पुढे असं घडु नये म्हणुन आता चांगलं वागणं हे आपल्या हातात आहे.. त्यानंतर येतात संस्कार , विचार आणि स्त्रीबद्द्ल असलेला आदर हा घरातून येतो जिथे शिक्षणाचा किवा डीग्रीजा काहीही संबंध नाही.. जेव्हा नवरा म्हणतो , तुला चार पैसे कमवायची अक्कल नाही तेव्हा प्रत्येक स्त्रीने लक्षात घ्यावं की आपल्याला स्वतःला बदलायची गरज आहे.. मग तो बदल वागणं , बोलणं , दिसणं , असणं , स्वभाव , अभ्यास , निरीक्षण आणि वेळप्रसंगी तोंड उघडता येणं या सगळ्यात करता यायला हवा.. म्हणजेच काय तर स्वतःला घडवता यायला हवं.. ज्याला करायचय त्याला खुप गोष्टी करण्यासारख्या आहेत.. मी नेहमी म्हणते , की आईने मुलाला सगळ्या गोष्टी शिकवाव्या म्हणजे तो बायकोला सगळ्या गोष्टी हातात दे असं तो म्हणत नाही .. गृहीणीला सगळं घर कायमच गृहीत धरतं आणि ती स्वतःही स्वतःला कमी लेखते.
घर चालवणं इतकं सोप्पं नाही हे सगळे पुरूष विसरतात.. ती एक उत्तम मॅनेजमेन्ट युनीव्हरसीटी आहे हे कोणीही लक्षात घेत नाही म्हणुन गृहीणीने घर सांभाळत असताना काहीना काही करत रहावं.. तिच्याकडे असलेल्या कलेचं सोनं करावं.. बाहेर अनेक लोकांना आपली गरज असते तिथे जाऊन काम करावं.. इच्छा असेल तर मार्ग दिसतो आणि कोणीना कोणी मदतीला येउन उभा रहातो..
स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं ..वाचन करावं आणि जो नवरा म्हणतो काडीचीही अक्कल नाही त्याची कृतज्ञता व्यक्त करावी कारण तो त्या स्त्रीला काहीना काही करायला उद्युक्त करतोय.. कारण सोन्याला चमकायला आगीतूनच बाहेर यावं लागतं.. अध्यात्म आहे ..त्यावर काम करुन आपला पुढचा जन्म सुरक्षित करावा.. त्यालाही वाटत असेल आपल्या बायकोने नाव कमवावं त्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत.. त्याच्या बोलण्यावर कुढत बसण्यापेक्षा आपल्याला घडवण्यावर तो वेळ वापरावा.. २०२४ मधे पुण्यासारख्या उच्चशिक्षीत घरात ही परिस्थिती आहे मग गावात काय असेल ??.. कल्पनाही करु शकत नाही.. खरच आपण संस्कारी आणि उच्चविचारी आहोत ??.. खरच स्त्रीला मातेसमान वागवतो ??.. किवा ती स्वतःला घडवायला समर्थ आहे ??.. ती बुरसटलेल्या मानसिकतेतुन खरच बाहेर येउ इच्छिते ??.. तिला खरच जगण्याचा अर्थ आणि आनंद कळलाय ??.. ती खरच स्वातंत्र्य आहे ??.. हे सगळे प्रश्न तिने स्वतःला विचारावेत आणि विचारांची तलवार बाहेर काढून स्वतःतल्या कमतरतेवर वार करावेत कारण फक्त आपणच आपल्याला घडवु शकतो.. बदलाची इच्छा हीच जगण्याची गुरुकिल्ली..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist