प्रतिनिधी ; कंधार
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या नांदेड लोहा कंधार विधानसभा क्षेत्रासाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी भाजपा च्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता ताई देवरे चिखलीकर व अशासकीय सदस्य पदी अड गंगाप्रसाद यन्नावार व अड मारुती पांढरे यांची निवड यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सुचनेनुसार एका पत्रकाद्वारे केली आहे.
शासनातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या या समितीत अध्यक्ष
पदी प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता ताई देवरे चिखलीकर व अशासकीय सदस्य पदी अड गंगाप्रसाद यन्नावार व अड मारुती पांढरे यांची निवड यांची निवड करण्यात आली आहे.
अशासकीय सदस्यांबरोबरच गटविकास अधिकारी, महापालिका, तहसील कार्यालय तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे सुलभतेने होण्यासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय समिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गठित केली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे,
ही समिती जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करून संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या निवडीबद्दल संघटन मंत्री संजय कौडगे,माजी खा प्रतापराव पाटील चिखलीकर , जिल्हा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.