काल आषाढ अमावस्या होती.. आज श्रावण सुरु झाला तसं उन्हही दिसायला लागलं .. खुप दिवसाने नक्कीच बरंही वाटलं पण काल खिडकीवर जमलेले पाण्याचे थेंब पाहून त्यातच रमावं वाटलं.. इतरवेळी पावसात रमणारी मी काल मात्र त्या थेंबात रमले.. खिडकीच्या लोखंडीबारवर जणू मोती लटकत होते.. मोत्यांच्या सरीने पावसाच्या सरीला बिलगले असं म्हटलं तरीही वावगं ठरु नये असं ते नयनरम्य दृश्य होतं..
काल सकाळी जवळपास १३ जण आम्ही ब्रेकफास्टला भेटलो होतो पण त्या थेंबाकडे लक्ष एकाचच गेलं याला म्हणतात क्रीएटिव्ह माइंड .. सोनल तिथे रील करुयात असही मला तो म्हणाला.. नजर कशी असावी आणि आपल्या फ्रेंडला काय आवडु शकतं हे फक्त कलाकार मित्रच ओळखु शकतो.. खुप पैसे असणं किवा खुप बुध्दीमत्ता असणं हा क्रायटेरियाच इथे असु शकत नाही.. लहान गोष्टीतुन दुसऱ्याला देता येणारा आनंद हा लाखमोलाचा असतो.. जेव्हा त्या थेंबावरुन माझं बोट फिरत होतं तेव्हा त्या खिडकीची घालमेल मी अनुभवली आणि पावसाला ती खिडकी पुन्हा पुन्हा तिच्याकडे बोलावत असल्याचा तो फिल होता.. त्या खिडकीनेही अनेक पावसाळे पाहिले असतील आणि त्या थेंबानी अशा अनेक खिडक्या..
थेंबे थेंबे तळे साचे याच म्हणीनुसार काल पुणेकर पुन्हा एकदा तळ्यात होते त्यांना पार्टी करायला मळ्यात यायचं होतं पण अनेक प्राण्यांचे जीव वाचवायला भगवंताने वरूण राजाला पाठवले आणि सगळी मंडळी पार्टीला बाहेर न पडता खिडकीत बसली.. वीतभर पोटासाठी काल अनेकांचे बळी जात असताना बळी राजाला मात्र फटका सोसावा लागला कारण कोणालातरी सुखी ठेवण्याच्या नादात कोणालातरी दुख भोगावच लागणार.. थेंब म्हणजे समुद्र नाही पण अनेक थेंबानी मिळुन समुद्र तयार होतो इतकी ताकद त्या थेंबात असते.. खिडकी पावसाळ्यात असा आनंद देते आणि इतर वेळी समोरच्या खिडकीत केस सोडुन बसलेली सुंदर ललना पहायला तीच मदत करते.. प्रियकराच्या घट्ट मिठीत जायला जेवढी प्रेयसी आतुर असते तेच नातं त्या खिडकी आणि थेंबाचं दिसलं.. खरं तर मी फार वेळ त्या खिडकीत नव्हते पण तिने मला आज तिच्यावर लिहायला भाग पाडलं.. प्रचंड सकारात्मक एनर्जी असलेला तो कोपरा होता आणि बाहेरून पाऊस मला खुणावत होता.. काल त्या खिडकीने आणि थेंबानी आमचं स्कीटही पाहिलं असेल आणि आमच्यातलं बॉंडींगही अनुभवलं असेल.. मैत्रीची हीच तर खरी ताकद आहे.. रोज अनेक नवनवीन मित्र करा आणि भेटत रहा.. म्हणजे पुढच्या फ्रेंडशिपडे पर्यंत मित्ररुपी फुलांच्या अनेक माळा आपल्या आयुष्यात सुगंध आणत रहातील..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist