योगिक तत्वज्ञान हे शरीर, आत्मा आणि मन यांच्यात सुसंवाद घडवून आणते… -योगाचार्य सिताराम सोनटक्के यांचे प्रतिपादन

 

 

नांदेड ( दादाराव आगलावे)

योगाची शिकवण आत्म-जागरूकता, अध्यात्मिक ज्ञान, अलिप्तता आणि मनाचे ज्ञान यांच्याभोवती फिरते आणि हे कार्य मागील आठ महिन्यापासून भक्ती लॉन्स येथे सुमित मोरडे यांच्या सहकार्यातून मोफत होते, या योगाभ्यासाचे आपण वारकरी व्हावेत, योगिक तत्वज्ञान हे तुमचे शरीर, आत्मा आणि मन यांच्यात सुसंवाद आणते असे प्रतिपादन योग गुरु योगाचार्य सितारामजी सोनटक्के यांनी केले. ” हर घर योग ” ही संकल्पना राबवत भक्ती लॉन्स ते तरोडा खुर्द मुळगाव योग जागृतीची रॅली काढण्यात आली त्यानंतर येथील हनुमान मंदिरासमोर योगाचा प्रचार व प्रसार करत रॅलीचे रूपांतर सभेत केले गेले केले.

 

त्यात योग गुरु सितारामजी सोनटक्के योग साधकांना मार्गदर्शन करताना अध्यक्षीय समारोपप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, उद्योजक अनिल शेटकर, चेअरमन केरबाजी कल्याणकर, उत्तमराव कल्याणकर, दिघे यांची प्रमुख उपस्थिती होती. योगगुरू सितारामजी सोनटक्के पुढे म्हणाले की,

आज आपल्या योग साधकांसाठी विशेष ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. आज पसून आपण ” हर घर योग ” ही संकल्पना साकारत आहोत. विशेष म्हणजे जसे भारतात हरिद्वार सोडले तर आपली योग शाखा पहिली ठरली आहे. “हरघर योग ” संकल्पना राबविणारी आपली नांदेड ची भक्ती लॉन्स शाखा भारतातली नंबर एक शाखा ठरणार आहे आणि हे सर्व आपल्या योग साधकांच्या सहकार्यामुळे शक्य होतं आहे. सर्वाना निरोगी, आनंदमय व सुखी जीवन जगण्याची ही गुरुकिल्ली आपण निःस्वार्थ भावाने मागील आठ महिन्यापासून सुरू असून यात आणखी मोठ्या प्रमाणात भर पडणे आवश्यक आहे.

 

योगाचे महत्त्व अनन्यसाधारण असून कुठलीही पीडा रुग्णालयाविना संपुष्टात येऊ शकते आपण या योगवारीचे वारकरी होऊन आपले कुटुंब सुखी ठेवावे ही भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार बालाजीराव कल्याणकर म्हणाले की योगाचे महत्त्व खूप आहे. आपण नियमित योग केल्यास आपणास रुग्णालयात जाण्याची गरज नाही. योग प्रसाराचे कार्य सितारामजी सोनटक्के गुरुजी यांच्या माध्यमातून भक्ती लॉन्स येथे मोफत होत आहे या संधीचा फायदा आपण सर्वांनी घेतला पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी अनिल शेटकर यांनी योगाचे महत्त्व विशद केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीपराव माने यांनी केले. कार्यक्रमात स्वागत स्वागतगीत राठोड ताई यांनी गायले. कार्यक्रमास सदाशिवराव बुटले पाटील, बालाजी वारले, किरण मुत्तेपवार, विलास कवठेकर, लक्ष्मणराव सुपारे , मकरंद पांगरकर, दादाराव आगलावे, लक्ष्मीकांत फुके, दिगंबर कल्याने वासरीकर, रुखमाजी मुदखेड मुदखेडे, मुंजाजी भोकरकर, अनिल कामीलवार, अवधूत गिरी, अनिल राठोड, मोहन गुरमे, पंकज आईनले, राजू लोखंडे, ईश्वर दासे, किशन पसलवाड, सौ. कल्पना मोरे, सौ. उज्वला जनकवाडे, सौ. रंजना सोनटक्के, सौ. गीता महाजन, सौ जयश्री शिंदे, स्नेहा मोहकर, सौ. जयश्री गंदेवार यांच्यासह गोविंद मांजरमकर लक्ष्मणराव कल्याणकर गावातील पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रारंभी आमदार बालाजी कल्याणकर, योग गुरु तथा पतंजली योगपीठ हरिद्वार अंतर्गत नित्ययोग समितीचे अध्यक्ष सितारामजी सोनटक्के गुरुजी व मान्यवरांच्या हस्ते हर घर योगा या रॅलीचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते योग साधनेचे महत्त्व विशद केलेले परिपत्रकाचे युमोचनही करण्यात आले. रॅलीत असंख्य महिला व पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सदरील रॅलीस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *