कंधार ; प्रतिनिधी
भारतीय ग्रंथालय शास्त्राचे प्रणेते पद्मश्री डॉक्टर शियाली रामामृतन रंगनाथन यांची 132 वी जयंती आज दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी डॉ .बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नगरपरिषद कंधार येथे ग्रंथ प्रदर्शन करून साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम कार्यक्रमास उपस्थित असलेले श्री रामेश्वर गोरे प्रशासक व मुख्याधिकारी नगरपरिषद कंधार यांनी डॉ. एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले .
तसेच श्री जितेंद्र ठेवरे स्वच्छता निरीक्षक, व मोहम्मद रफीक सत्तार स.ग्रंथपाल यांनी डॉ. एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. यावेळी अभ्यासिकेतील वाचकांनी वाचकांना मिळत असलेल्या सोयी सुविधेबद्दल तसेच विद्यार्थ्यांसाठी आसन व्यवस्था चे नाविन्यकरण करण्यासाठी पत्र देऊन श्री रामेश्वर गोरे सर प्रशासक व जितेंद्र ठेवरे यांचे शाल पुष्पहाराने सत्कार केले.
यावेळी मोहम्मद रफीक सत्तार यांनी पद्मश्री डॉ. एस आर रंगनाथन यांच्या ग्रंथालय शास्त्रासाठी अमूल्यकार्य केलेल्या कार्याबद्दलबद्दल माहिती दिली. तसेच श्री मधुकर धर्मापुरीकर साहित्यिक व निवृत्त एडिटर नांदेड, यांच्यातर्फे ग्रंथालयास देणगी स्वरूपात प्राप्त झालेले नवीन ग्रंथाचे एकदिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी श्री रामेश्वर गोरे सरांनी विविध स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले, तसेच सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले की, उपस्थित विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी अयशस्वी होणार नाही यापैकी सर्वच सर्व विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतील अशी अपेक्षा व्यक्त केल तसेच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी सरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विविध रूपाने सत्कार करण्यात येईल असेही विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले.
तसेच नवीन पुस्तके खरेदी करण्याची असल्याने विद्यार्थ्यांना त्याने हवी असलेली नवीन पुस्तकांची यादी 14 ऑगस्ट 2024 पर्यंत करून देण्यासाठी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी केलेली आसन व्यवस्थेची मागणी लवकरच पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले, यावेळी मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालय कर्मचारी श्री दता ऐनवाड, श्री मिलिंद महाराज, यांनी परिश्रम घेतले.