बांगलादेश मधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार विरोधात कंधार येथे निषेध मोर्चा

 

कंधार-
बांगलादेशमध्ये गृहयुद्धात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्याकरिता कंधार, ‘सकल हिंदू समाजा कडून बांग्लादेशा विरोधात निषेध मोर्चाकडून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले

दि १७ ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाज कंधार च्या वतीने कंधार तहसील व निषेध मोर्चा काढन्यात आला या वेळी दिलेल्या निवेदनात, बांगलादेशात अंतर्गत हिंसाचाराच्या अडून असंख्य हिंदूंची हत्या केली गेली ,अमानुष अत्याचार व बलात्कार केले गेले
हिंदू वरील अत्याचारा विरोधात त्वरित कडक निर्णय घ्यावेत व हिंदू समाजाची सुरक्षा निश्चीत करावी किंवा भारतामध्ये त्यांना प्रवेश देवून नागरिकत्व दयावे त्याच्या मालमत्तेची मंदिराची मोठ्या प्रमाणात तोड फोड करण्यात आली आहे लहान मुलांची व पुरुषांची क्रुर हत्त्या केली गेली तसेच महिला व मुलींवर बलात्कार केले व त्यांचे अपहरण करण्यात आले आहे हे त्वरित थांबले पाहिजे आम्ही सकल हिंदू समाज या घटनेचा जाहीर निषेध करीत , केंद्र शासनाने या सर्व घटनेला गांभींऱ्याने घेवुन या विषयी कठोर पाऊल उचलावे. असे सकल हिंदू समाज कंधारच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *