19 ऑगस्ट रोजी सोमवारी नारळी पौर्णिमा हा सण साजरा होत आहे. श्रावण म्हटलं की- व्रतवैकल्याचा महिना नागपंचमी,राखी पौर्णिमा
,नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी,दहीहंडी, श्रावणी पाच सोमवार ,आणि बैलपोळा अशा पद्धतीने पवित्र महिना म्हणून पोथी- पुराण वाचले जातात, देवदर्शन केले जाते,निसर्ग आणि मानव यांचे अतूट नाते आहे. निसर्गातील जैवविविधता, जंगले, जमीन प्राणी यांचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. दररोज अनेक एकर शेती वेगवेगळ्या इमारती, रस्ते,घरे बांधण्यासाठी कमी होत आहे. झाडे तोडली जात आहेत. निसर्गाचे संवर्धन केले नाही तर मानव एक दिवस फार अडचणीत येईल, म्हणून झाडे लावा ,झाडे जगवा, पाणी आडवा, पाणी जिरवा, असे वेगवेगळे उपक्रम आपण हाती घेतले तरच पुढील पिढी योग्य प्रकारे जीवन जगू शकेल ,आज आपण नारळी पौर्णिमा का साजरी करीत आहोत. याविषयी थोडी माहिती घेऊ…
भारताला 7517 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे , त्यामुळे कोळी बांधव त्यातून मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात,त्यामुळे सर्व काही व्यवस्थित चालते त्यासाठी कृतज्ञता पाळून समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करतात. कारण त्याचे सर्व भाग पाणी, खोबरे आणि फांद्यापासून बनविण्यात येणाऱ्या दोरी यामुळे उपयुक्त आहे, म्हणून नारळ समुद्राला अतिशय प्रिय आहे. त्यासाठी ते वाहिले जाते.
मानवाचा आणि समुद्राचं नातं तसं फार जवळच आहे.समुद्रातून मानवाला शंख, शिंपले ,मासे मिळतात , या मासेमारीवर मानव आपला उदरनिर्वाह करतो म्हणून दरवर्षी नारळी पौर्णिमा गोवा, गुजरात, महाराष्ट्र यांच्या सागरी किनारपट्टीवर अतिशय आनंदाने, उत्साहाने साजरी करतात,कोळी बांधव नृत्य, वेशभूषा करून हा सण साजरा करतात ,त्या समुद्राला सोन्याचे नारळ अर्पण करून वरूण राजाची मनोभावे पूजाअर्चा करतात, म्हणून सागरी किनारा आपल्याला स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे, समुद्रात जाणारे जहाज यांच्यातून होणारी तेल गळती होता कामा नये, त्यामुळे पाणी प्रदूषित होऊन त्यांचा आरोग्यावर परिणाम होतो, प्लास्टिकचा कचरा तर आता फार वाढलेला आहे, तो कचरा कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना आहेत, परंतु मानव त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लाखो टन कचरा आज समुद्रात तरंगत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याचे आरमार त्याचा समुद्र म्हणून समुद्रावर राज्य केले आहे, वेगवेगळ्या होड्या बनवून समुद्र आपल्या ताब्यात घेतले होते. या समुद्राचे रक्षण करणे आज काळाची गरज आहे. काही वर्षांपूर्वी कसाब नावाचा व्यक्ती समुद्र किनारपट्टी मार्ग मुंबई मध्ये आला आणि त्यांनी मुंबईवर हल्ले केले.
म्हणून आपली समुद्रकिनारपट्टी किती सुरक्षित आहे याचे चिंतन होणे गरजेचे आहे. नारळी पौर्णिमेला कोळी बांधव खुश होतात, सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी दरवर्षी समुद्र किनारपट्टी स्वच्छ केली जाते हे कामगिरी तटरक्षक दल करीत आहे. म्हणून आपण सर्वांनी कोणताही प्रकारचा कचरा नदीपात्रात न फेकता खड्ड्यात घालून पेटून द्यावे, तेव्हा समुद्र स्वच्छ राहील, सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांनी समुद्राच्या काठावर पाण्याचा रिकामा झालेल्या बाटल्या, नारळ पाणी पिऊन फेकून दिले नारळे, इतर वस्तू टाकून अस्वच्छ करू नये, याची आपण काळजी घ्यावी आणि समुद्रापासून मिळणारे उत्पन्न मनुष्याने करून घ्यावे, कोकण किनारपट्टीवरील सर्व व्यक्तींचे जीवन समुद्रावरच अवलंबून आहे. त्यामुळे नारळी पौर्णिमा हा सण समुद्राच्या कृतज्ञता मानण्याचा सण आहे.नारळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*