पतंजलीचे नांदेड येथील योगाचार्य सितारामजी सोनटक्के गुरुजी यांचे मोफत नित्ययोग केंद्र जीवनाला दिशा देणारे आहे -गोविंद नांदेड यांचे प्रतिपादन

 

भक्ती’ लॉन्स येथे आठ महिन्यापासून निशुल्क योग सुरू….हर हर योग रॅलीचा दुसरा आठवडा

नांदेड:( दादाराव आगलावे ) भक्ती लॉन्स येथे मागील आठ महिन्यापासून योग गुरु सितारामजी सोनटक्के गुरुजी यांच्या माध्यमातून मोफत योग वर्ग सुरू असलेले पतंजलीचे नांदेड येथील केंद्र जीवनाला दिशा देणारे आहे असून, शासनाने अशा योग केंद्रांना पुरस्कृत करून गावा-गावात जशा शाळा काढल्या तशा गावा गावात योग शाळा काढाव्यात म्हणजे समाजाला दवाखाने आणि पोलीस स्टेशनची गरज पडणार नाही असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी केले.

पतंजली योगपीठ हरिद्वार अंतर्गत मोफत नित्य योगा शाखा नांदेड यांच्यावतीने ” हर घर योग ” या संकल्पित योग दिंडीचे दर रविवारी आयोजन करण्यात येते. आजच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेड यांच्या हस्ते योग दिंडीचा शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास योग समिती चे अध्यक्ष गुरुवर्य सितारामजी सोनटक्के यांचे प्रमुख उपस्थिती होती. अतिशय उत्कृष्ट वक्तृत्व शैलीत, आपल्या अथांग ज्ञानाचे कवाडे उघडत गोविंद नांदेड यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि नामदेव यांच्या अभंगाचे योगाशी सांगड घालत योग साधनेची महती विशद केली. त्यांनी भक्तिलॉन्स येथे चालणाऱ्या मोफत नित्य योग साधनेचे कौतुक करत योगाचार्य सिताराम सोनटक्के यांच्या निस्वार्थ मेहनत, कष्ट व त्यागाचे तोंड भरून कौतुक केले.

ते पुढे म्हणाले, जग तिसऱ्या महायुद्धात ढकलले जात आहे, याला थोपवायची असेल तर जगात योगाशिवाय पर्याय नाही. योगामुळे संकल्पाचे बीज रोवले जाते, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज यांना “श्रीमंत योगी ” असे समर्थ रामदास यांनी म्हटले आहे. जगाला आरोग्य, योगाचे ज्ञान देणे ही एक राष्ट्रभक्तीच असून शासनाने गावागावा जशी शाळा सुरू केली तशा योगशाळा ही निर्माण कराव्यात म्हणजे हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशनची गरज भासणार नाही. अशा योग केंद्रांना शासनाने पुरस्कृत करावे. कार्यक्रमाच्या प्रारंभी नित्ययोग समितीचे अध्यक्ष योग गुरु सिताराम सोनटक्के, उपाध्यक्ष सदाशिवराव बुटले पाटील, सचिव बालाजी वारले यांनी स्वागत केले. अवधूत गिरी यांनी प्रस्तावना करत गोविंद नांदेड यांच्या कार्याचा गौरव केला.

यावेळी योग गुरु सितारामजी सोनटक्के गुरुजी यांनी सुमित मोरगे यांनी भक्ती लॉन्स येथे मोफत वर्ग घेण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सुमित मोरगे यांचे आभार मानले. सर्वांचे आभार अनिल माने यांनी मानले. नंतर “हर घर योग” या दिंडीद्वारे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, योगाचार्य सिताराम सोनटक्के यांच्यासह नित्ययोग समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य व शेकडो योग साधक यांचे उपस्थितीत राज गॅलेक्सी, वेदांत नगर या परिसरात योगसाधनेबाबत जनजागृती करून लोकांना माहितीपत्रकांचे वाटप करून भक्ती लॉन्स येथे योगाला येण्याचे आवाहन केले.ज्येष्ठ पत्रकार मकरंद पांगरकर व पंकज आयनीले यांनी हर घर योग चे अफलातून चित्रीकरण केले. कार्यक्रमास सदाशिवराव बुटले पाटील, बालाजी वारले, किरण मुत्तेपवार, विलास कवठेकर, लक्ष्मणराव सुपारे , मकरंद पांगरकर, लक्ष्मीकांत फुके, दिगंबर वासरीकर, रुखमाजी मुदखेडे, मुंजाजी भोकरकर, अनिल कामीनवार, अवधूत गिरी, अनिल राठोड, मोहन गुरमे, पंकज आयनले, राजू लोखंडे, इश्वर दासे, किशन पसलवाड, सौ. कल्पना मोरे, सौ. उज्वला जनकवाडे, सौ. रंजना सोनटक्के, सौ. गीता महाजन, सौ जयश्री शिंदे, स्नेहा मोहकर, सौ. जयश्री गंदेवारसह रॅलीत असंख्य महिला व पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सदरील रॅलीस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *