तुम्ही माझी बहीण व्हाल का ??

 

किती विरोधाभास आहे पहा.. काल एका फॅनचा मेसेज होता की सोनल मॅम तुम्ही माझी मैत्रीण व्हाल का ??.. मी मेसेज वाचला आणि रीप्लाय न करता माझ्या कामात राहिले.. कारण यांच्या मैत्रीच्या व्याख्या मला चांगल्याच माहीत आहेत.. आज दुसऱ्या एका वाचकाचा मेसेज आला कि ताई तुम्ही माझी बहीण व्हाल का ??.. हा मेसेज वाचल्यावर मी त्यांना रीप्लाय केला , त्यांना म्हटलं , तुम्हाला बहीण नाही का ??.. काय करता आणि कुठे असता ??अगदीच जनरल प्रश्न होते आणि त्यावर त्यांनी रीप्ल्याय पण दिले.. रक्षाबंधन , भाऊबीज या सणाना भाऊ , बहीण यांची आठवण येणे साहजिकच आहे पण मला दोन भाऊ असुन कुठे भेटता येतं.. काही वेळा काही गोष्टी शक्य नसतात पण प्रेम , माया असतेच की.. ज्यांना बहीण , भाऊ नाहीत ते मानलेली नातीही जीवापाड जपतात पण ज्यांना हेही नाही त्यांच्यासाठी बहीण , भाऊ ,आईवडील सगळी नाती आहेत आणि तो म्हणजे भगवंत.. सगळं काही त्याच्यासाठी करा..

त्याच्याइतकं प्रेम करणारा दुसरा कोणीही नाही.. बाहेर अनाथ मुलं , मुली आहेत त्यांनाही कोणी नसतं अशांसाठी तुम्ही भाऊ / बहीण ही नाती देउ शकता.. काहीही नाही म्हणुन रडत न बसता हे विश्वची माझे घर असं म्हणुन सतत हसत रहा आणि आनंदी रहा कारण येतांना येणार एकटे आणि जाणारही एकटेच असतो… भगवंतासोबत आपलं नातं घट्ट करा आणि त्याच्यासोबत बोलत रहा.. चांगली कर्म करत रहा फक्त काहीही मागु नका.. त्याला सगळं माहीत आहे तो योग्य वेळी योग्य गोष्टी योग्य व्यक्तीला देतो.. पुस्तका सारखा सखा नाही तसा पुस्तकासारखा भाऊही नाही आणि बहीणही नाही.. त्यामुळे नवनवीन गोष्टी आत्मसात करा… कुठल्याही नात्यात आपण अति गुंतलो की आपण भक्तीत मागे रहातो कारण नाती ही फक्त इथे आहेत आणि त्याचा संबंध शरीराशी आहे..

त्यामुळे योग्य ज्ञानाने आपण किती , कशात आणि कोणात अडकायचं ते ठरवलं की आपल्याला एकाकीपण कधीही येत नाही कारण जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा कृष्ण आपल्यासोबत असतो.. सतत त्याच्या सोबत रहा.. सतत त्याचं नाव घ्या . माझ्यासारख्या बहीणीची अजिबात गरज लागणार नाही ..
माणसं ही लागतातच , पाठीवर थाप मारायला सुध्दा कोणीतरी लागतं पण कोणी सोबत नसलं तर आपण उदासही राहायला नको इतकं आपण स्वतःला तयार करायचं.. कारण मानसिक रुग्ण बरे व्हायला वेळ लागतो पण शारीरिक आजार औषधाने बरे होतात.. त्यामुळे आपला आनंद आपल्याला शोधता यायलाच हवा ना.. आज एक रील पाहिले , एक वयस्कर गृहस्थ स्वतःचा वाढदिवस एकटेच पेस्ट्री कापून साजरा करत होते.. नाही कोणी तर नाही त्यांनी त्यांच्या महत्वाच्या दिवसाचा आनंद घेतला..व्हीडीओ पाहून खुप मस्त वाटलं.. कोणी नाही म्हणुन रडत बसण्यापेक्षा *मी माझ्यासाठी आहे * हे वाक्य आणि तसं वागणं नक्कीच आयुष्याला उभारी देतं..
#SonalSachinGodbole

#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *