तालुका प्रतिनिधी, कंधार
——————-
माजी जिल्हा परिषद सदस्या तथा उपाध्यक्षा नांदेड जिल्हा महिला काँग्रेस सौ.वर्षाताई भोसीकर यांनी आगामी लोहा विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे अर्ज सादर केला आहे.
सौ.वर्षाताई भोसीकर ह्या काँग्रेस पक्षाचे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या सून आहेत. माजी जि.प.सदस्य तथा लोहा-कंधार विधानसभा काँग्रेस पक्षनिरीक्षक संजय भोसीकर यांच्या पत्नी आहेत. त्या सन २००७ ते २०१० मध्ये कंधार पंचायत समितीच्या उपसभापती होत्या. तसेच सन २०१२ ते २०१७ मध्ये फुलवळ जिल्हा परिषद गटाच्या सदस्य होत्या. नांदेड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून वर्षाताई भोसीकर या काम करत आहेत.
विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. काँग्रेस पक्षाच्या डिजीटल सदस्य नोंदणीचे उत्कृष्ट कार्य नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य नोंदणी केली आहे. महिलांचे मोठे संघटन बांधले आहे.
सौ. वर्षाताई यांनी कुपोषण मुक्तीचा लढा सुरूवात करून कुपोषण मुक्ती अभियान राबवले आहे. ग्राम स्वछता अभियान,पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून पुरस्कार मिळवला आहे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शौचालयाची बांधकामे करून घेतली आहेत,ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची प्रलंबित असलेल्या गावातील पाण्याचे कायमस्वरूपी प्रश्न सोडवलेले आहेत डिजिटल शाळा खोल्या, डिजिटल अंगणवाडी, महिलांसाठी विविध योजना ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे, जल संधराणा ची कामे, ग्रामीण रस्ते, गावातील अंतर्गत रस्ते, अशा प्रकारचे कित्येक सामाजिक उपक्रम वर्षाताई यांनी आजपर्यंत राबवलेले आहेत या त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विविध माध्यमातून अनेक विविध क्षेत्रातील पुरस्कार आतापर्यंत मिळालेली आहेत.
आता सौ.वर्षाताई भोसीकर पक्षाने उमेदवारी दिल्यास आगामी लोहा विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.