नांदेड, दि. १७ ऑगस्ट २०२४:
संसदेच्या अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या लोकलेखा समितीवर राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातूनल खा. प्रफुल्ल पटेल यांचाही या समितीत समावेश आहे.
संसदीय संकेतानुसार लोकलेखा समितीचे अध्यक्ष पद विरोधी पक्षाला देण्यात आले असून, अध्यक्षपदी काँग्रेसचे खा. के.सी. वेणुगोपाल यांची वर्णी लागली आहे. या समितीत लोकसभेतून १५ तर राज्यसभेत ७ खासदारांचा समावेश करण्यात आला असून, त्यामध्ये लोकसभेचे टी.आर. बालू, डॉ. निशिकांत दुबे, जगदंबिका पाल, जय प्रकाश, रविशंकर प्रसाद, सी.एम. रमेश, एम. श्रीनिवासुलु रेड्डी, प्रो. सौगत रॉय, अपराजिता सारंगी, डॉ. अमर सिंह, तेजस्वी सूर्या, अनुराग सिंग ठाकूर, बालशौरी वल्लभनेनी, के.सी. वेणुगोपाल, धर्मेंद्र यादव तर राज्यसभेतून अशोक चव्हाण, शक्तीसिंह गोहिल, डॉ. के. लक्ष्मण, प्रफुल्ल पटेल, सुखेंदू शेखर राय, तिरुची शिवा, सुधांशू त्रिवेदी यांची नावे आहेत.