कंधार आगारात रक्षाबंधन कार्यक्रम ;ब्रह्माकुमारी ज्योती बहेनजी यांनी व्यसन सोडण्याचे  केले आवाहन

(कंधार  ; दिगांबर वाघमारे )

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय उपसेवा केंद्र कंधार तर्फे ब्रह्माकुमारीज कंधार च्या संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती बहेनजी यांच्या वतीने आज दि.१७ ऑगस्ट रोजी कंधार आगारात रक्षाबंधन कार्यक्रम आगार प्रमुख अभय वाढवे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला .महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे , माणिक बोरकर आदीसह कंधार आगारातील वाहक चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय उपसेवा केंद्र कंधार तर्फे ब्रह्माकुमारीज कंधार च्या संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती बहेनजी नेहमीच विविध सामाजीक उपक्रम राबवतात , बस चालक वाहक आपल्या कुटुंबापासून दूर राहून सेवा बजावतात परिणामतः त्यांना अनेक सण उत्सवाचा आनंद घेता येत नाही हा धागा पकडून कंधार अगारातील वाहक चालक यांच्यासाठी रक्षाबंधन उपक्रम घेण्यात आल्याची माहिती यावेळी ब्रह्माकुमारी ज्योती बहेनजी यांनी कार्यक्रमात दिली .यावेळी राखी बांधून ओवाळणी म्हणून असलेले व्यसन सोडण्याचे आवाहन केले .

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्योती बहेनजी, सतिश भाई, ज्ञानेश्वर भाई,संगीता माता, डॉ. वर्षा डांगे, सिमा बहन, चंद्रकला माता, पार्वती माता, पदमा माता, शिवानी बहन, अश्विनी माता, विजय भाई, ओमकार भाई, पार्थ भाई, साई भाई, श्रद्धा बहन, सृष्टी बहन इत्यादींनी सहकार्य दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *