(मुखेड: दादाराव आगलावे )
श्री संत नामदेव महाराज विद्यालय दापका (राजा ) या विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहन करून ह . भ . प . नामदेव महाराज दापकेकर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापक शिवाजी डावकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमासह स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला . शाळेच्या वतीने गावामध्ये लेझीम पथकाचे सादरीकरण करण्यात आले. या शाळेतील माजी विद्यार्थी दिलीप दिवाकर केंद्रे यांची नुकतीच PSI पदी नियुक्ती तसेच रविकांत मनोहर बोईनवाड यांची महाराष्ट्र पोलीस पदी नियुक्ती तसेच बळीराम किशन सलगरे यांची एस. टी . चालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ परीक्षेत प्रथम द्वितीय तृतिय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व शाळेतील माजी विद्यार्थ्यांकडून रोख रक्कमेच्या स्वरूपात बक्षिस देण्यात आले. शाळेतील विषयशिक्षकांच्या वतीने विषयात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थांना रोख रक्कमेच्या स्वरूपात बक्षिस देण्यात आले . विद्यार्थ्यांना बक्षिस देणाऱ्या सर्व दानशूरांचे शाळेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक शिवाजी डावकरे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमागची भूमिका विशद केली.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लेझीम पथकास कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुलिंदर गायकवाड, चंद्रकांत तेलंगे, यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमास मुख्याध्यापक शिवाजी डावकरे, वसंत चव्हाण, बुद्धाजी किनवाड, दादाराव आगलावे, सतीश मस्कले, सचिन बादेवाड, प्रदीप दापकेकर, रवी हादवे, सुलींदर गायकवाड, चंद्रकांत तेलंगे,अशोक धुळशेट्टे यांच्यासह पालक, गावातील नागरिक, माजी विद्यार्थी, दानशूर व्यक्ती, तसेच विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत तेलंगे यांनी केले तर बुद्धाजी किनवाड यांनी आभार मानले. पारंपारिक वेशभूषासह लेझीम पथकाचे सादरीकरण ग्रामस्थांसाठी एक आकर्षण ठरले.