सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने तत्पर राहावे ; आ. शिंदे कुटुंबीय प्रशासनाच्या सदैव भक्कम पाठीशी; सौ.आशाताई शिंदे

 

लोहा: प्रतिनिधी

78 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या सौ .आशाताई श्यामसुंदर शिंदे व लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा युवा नेते विक्रांत पाटील शिंदे यांनी लोहा तहसील कार्यालयातील ध्वजावंदनास उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला सलामी दिली यावेळी आशाताई शिंदे, विक्रांत पाटील शिंदे यांच्या हस्ते तालुक्यातील माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी आशाताई शिंदे व सभापती विक्रांत पाटील शिंदे यांनी सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी लोहा पंचायत समिती कार्यालयाला नुकताच ISO मानांकन प्राप्त झाल्यामुळे आशाताई व विक्रांत शिंदे यांनी पंचायत समिती कार्यालयाची पाहणी करून आनंद व्यक्त करत लोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डि .के.आडेराघो व कार्यालयीन प्रशासन अधिकारी सतीश चोरमले, कनिष्ठ कार्यालयीन प्रशासन अधिकारी प्रियदर्शन वाघमारे व सर्व पंचायत समिती टीमचे कौतुक करून चोरमले व प्रियदर्शन वाघमारे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, यावेळी आशाताई शिंदे बोलताना म्हणाल्या की, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मेहनतीमुळे लोहा कंधार मतदारसंघातील लोहा पंचायत समितीला आय.एस.ओ मानांकन मिळाल्यामुळे मतदारसंघाची मान उंचावली असून सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहावे आमदार शिंदे कुटुंबीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे यावेळी बोलताना आशाताई शिंदे यांनी सांगितले,

यावेळी तहसीलदार विठ्ठल परळीकर यांना आशाताई शिंदे व सभापती विक्रांत शिंदे यांनी ई पीक पाहणी रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात आली यावेळी तहसीलदार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, यावेळी उपसभापती श्याम अण्णा पवार, समन्वय समिती सदस्य सिद्धू वडजे, बोरगावचे सरपंच प्रतिनिधी पुंडलिक बोरगावकर, बाजार समितीच्या संचालिका पूनमताई क्षिरसागर, चेअरमन नागेश हिलाल, संचालक सुधाकर सातपुते, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य अशोक सोनकांबळे, व्‍यंकटी आढाव, अजय हंकारे, भरत गायकवाड, प्रसाद जाधव, अमोल गोरे , माजी नगरसेविका पुष्पलता कापुरे सह कार्यकर्ते, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *