कंधार ; प्रतिनिधी
उर्ध्व मानार धरण लिंबोटी 93% भरले असल्याची माहिती संबंधित विभागाकडून प्राप्त झाली आहे.त्या अनुषंगाने सर्व संबंधित गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा तहसिल कार्यालयाकडुन सर्व संबंधित तलाठी यांच्या मार्फत देण्यात आला आहे…
उर्ध्व मानार धरण लिंबोटी मुळे निम्न भागातील पुरामुळे बाधित होणारी लोहा व कंधार तालुक्यातील गावे
1) लिंबोटी
2) चोंडी
3) दगड्संगावी
4) मांजरे सांगवी
5) बोरी खु
6) उमरज
7) शेकापूर
8) घोडज
9) हणमंतवाडी
10) डोंगरगाव
11) संगमवाडी
12) कोल्ह्यांचीवाडी
13) इमामवाडी
वरील गावातील नागरीकांनी नदीपात्रातुन जाणे टाळावे,व सर्तक रहावे.
सौजन्य ; – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड