तोंडात गोड आणि मनात खोड’

 

सध्या बरेच माणसे दिसायला वरवर चांगले दिसतात, परंतु त्यांच्या मनात खोड असते. आपल्याला असे बरेच उदाहरणे पाहता येतात; की, छत्रपती शिवाजी महाराज यांना भेटण्यासाठी अफजलखान विजापूर येथून विडा उचलून वाईहून निघाला, पंढरपूर मार्ग तो प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. तोंडामध्ये अतिशय गोड भाषा तो बोलू लागला” *या राजे भेटा आम्हाला* तुम्ही आमच्या मुलासारखे आहात!, परंतु हे बोलणं त्याच फसवणूक (करणारे होतं. मनात कपट व खोड धरून गोड बोलून कायम स्वरूपी काटा काढण्यासाठी शामिन्यात आला होता, हे सर्व महाराजांनी ओळखून घेतले होते. त्यामुळे सोबत अंगरक्षक घेऊन अंगात चिलखत.बोटात वाघनखे, डोक्यावर जिरेटोप घालून ते त्याला भेटण्यासाठी अतिशय हुशारीने गेले होते, शेरास सव्वाशेर होते म्हणून महाराज वाचले, नसता इतिहास वेगळा झाला असता यालाच म्हणतात, तोंडात गोड आणि मनात खोड आहे. आज समाजामध्ये असे बरेच माणसं वेगवेगळे मुखवटे घालून फिरून फसवत आहेत. फक्त बोलताना अतिशय गोड बोलून आपल्या पायावर पाय देत आहेत, हे समाजातील लोकांनी ओळखून घ्यावे. जवळ बसणाऱ्या लोक सुद्धा अशा पद्धतीने वर्तन करत आहेत.
भाऊकीची लोक यामध्ये सर्वात पुढे असतात, कारण बोलण्याची भाषा वेगळी आणि वागण्याची भाषा वेगळी अलीकडच्या काळात तयार झाली आहे *मुह मे राम। बगल मे छुरी* अशा पद्धतीने अगोदर पासूनच आपण ऐकतो. म्हणून सदसदविवेकबुद्धीने सध्याला वागण्याचा प्रयत्न करावे, कधीही कोणावर ही शंभर टक्के विश्वास ठेवू नका ? अति लोभ झाल्यानंतर सुद्धा वाईटपणा येतो, आणि मग असे माणसे मनात खोड ठेवून आपल्याला दगाफटका करण्याची दाट शक्यता असते. अनेक प्रेमवीर प्रेमिका सोबत गोड बोलत असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अनैतिक कृत्ये करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. विवाहाचा विषय काढला की काय घाई आहे? आताच कोणते वय आपले झाले आहे, असे म्हणून चल पुढच्या…..चल पुढच्या ओढ्यात असे गोड बोलून वेळ मारून नेतात आणि टाळतात.
हे सर्व सध्या सर्वत्र सुरूच आहे, त्यासाठी तुम्ही चानाक्षबुद्धीने रहा, चला आपण इकडे जाऊ ,तिकडे जाऊ सहलीला जाऊ, मामाच्या गावाला जाऊ, देवदर्शन करून येऊ,म्हणून मुलींना गोड बोलून आपल्या मोहपाशात पाडून विश्वासात घेतात,आणि दगाफटका करतात
.अपहरण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे गोड बोलणाऱ्या लोकांपासून दोन हात दूर राहावे, काही लोक बरेच नाटकी असतात, दिसल्या बरोबर लगेच वाकून नमस्कार करणे
,तोंड भरून स्तुती करणे, किंवा तेवढ्यापुरतेच बोलून आपला हेतू साध्य करून घेणे आणि लगेच सोडून देणे असे ही काही गणगोत आहेत, त्यामुळे गोड बोलण्याला फसवू नका काल्पनिक बोलण्याला भाळू नका, बरेच जण काल्पनिक मोठेपणा सांगतात, आम्ही आता हे घेणार आहोत? ते घेणार आहोत ? आता आम्ही लगेच मोठी खरेदी करणार आहोत? असे बोलतात आणि वास्तविकता वेगळी असते. म्हणून *लबाडाचं आवतण जेवण केल्याशिवाय खरे नसते*, म्हणून आज समाज प्रगतशील झाला, सत्ता, संपत्ती, पैसा जवळ आला, परंतु माणुसकी दूर गेली, कारण तुम्हालाच निवडून देऊ म्हणणारे, लोक सुद्धा एका रात्रीत बदलून जातात, आणि निकाल दुसऱ्याच बाजूने लागतो, त्यासाठी तोंडात अतिशय गोडवा धरून बरोबर एखाद्याची कशी खोड मोडायची ते मोडतात. म्हणून तुम्ही सगळे जाणून निर्णय घ्या. निर्णय क्षमता तुमची मजबूत असावी. जाहिरात करते वेळेस लोक अतिशय गोड बोलतात. तुमच्याकडून जाहिरातीचे पैसे काढून घेतात.
आणि त्या जाहिरातीतून नंतर वेगळाच अर्थ निघतो मग ते परत आपल्याला बोलू देत नाहीत. एके ठिकाणी जाहिरातीत ट्रॅक्टर खरेदीवर मारुती (फ्री) मोफत दिला जाईल असे बोलले, मात्र त्यांनी मारूती गाडी देण्या ऐवजी मारुतीची मूर्ती ग्रहाकांना मोफत दिली असे ही काही गोड बोलून फसवणारे लोक आहेत, सध्या समाजात काही बाबा, भगत, बुवा, महाराज वावरत आहेत,हे अतिशय गोड बोलून मठाच्या वाऱ्या करायला लावत आहेत. पुढच्या वारीमध्ये तुमचं चांगलं होईल, असं नुसतं गोड बोलून अज्ञानी निरक्षर माणसाची फसवणूक करीत आहेत, पैशाचा पाऊस पाडतो म्हणून सुशिक्षित लोकांना सुद्धा भगत फसवतात,
हे त्यांना फार उशिरा कळते, म्हणून अशा लोकांपासून होता होईल, तेवढे सावधान राहण्याचा प्रयत्न करावे, अति गोड बोलणं धोकादायक असते असे अनेक उदाहरणावरून आपल्याला सांगता येते, त्यासाठी आपण संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय एखाद्या गोष्टीला होकार नकार देऊ नये, त्या ठिकाणची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे, तेव्हाच आपल्याला खरी माहिती मिळते, चुकीच्या माहितीतून आपला घात होतो, बरेच लोक फक्त गोड बोलून तुम्हीच यंदाच्या निवडणुकीत भावी…..होणार आहात, तुमच्या एवढे हुशार कोण आहे, बाकीच्यांना काय कळते, असे अर्धसत्य बोलून मोठेपणा देऊन हरभऱ्याच्या झाडावर चढवतात, आणि नंतर चारी मुंड्या चीत करून फिदी फिदी हसत बसतात, हे होऊ नये म्हणून कोणाच्याही गोड बोलण्याला भाळून जाऊ नका, आपल्या माणसांना थोडा मोठेपणा कोणी दिला की आपण फार भाळून जातो, संपूर्ण घरदार त्यांना दाखवतो, जमीन -जुमला नोकर चाकर, डामडौल त्यामुळे पुढील व्यक्तीला आपला अंदाज येतो, आणि आपण फसतो, त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये विवाहासाठी गोड बोलून मुली आणून देत आहेत, आणि दोन-तीन दिवसात त्या मुली त्या घरातून दाग दागिने,पैसे घेऊन पोबारा करत आहेत, गोड बोलून काम करून घेणे वेगळे आणि गोड बोलून मुद्दाम कपटनीतीने फसवणे वेगळे यात बराच फरक आहे. पुतना मावशी श्रीकृष्णाला दूध पाजण्यासाठी अप्सरेचे रूप घेऊन आली होती, मी कृष्णाची मावशी आहे. असे दरबारातील लोकांना सांगत होती, तिची ही कूटनीती श्रीकृष्णाने ओळखली होती, त्यामुळे तिला मरणाला सामोरे जावे लागले,
काही लोक फ्लाॅट खरेदी-विक्री मध्ये सुद्धा गोड बोलून दोघांच्या नावावर खरेदी करून देतात,आणि मनातून फसवणूक करतात, महाभारतातील एक घटना वास्तविक आहे. धृतराष्ट्राने भीमाला आलिंगन देण्याची इच्छा व्यक्त केली, आणि त्यावेळेस तो गोड गोड बोलत असला तरी भीमाला त्याच्या बहुपाशात घेऊन ठार मारण्याची त्यांनी योजना आखली होती,ही कपटनीती श्रीकृष्णांनी ओळखली आणि धृतराष्ट्राच्या पुढे लोखंडी पुतळा तयार करून ठेवला, कपटनीती काय असते? कशा पद्धतीने वागून त्या घटने मधून सही सलामत बाहेर यावे,हे ज्याला कळते तो व्यवस्थित जीवन जगतो कपटनीतीने किंवा कूटनीतीने दुसऱ्याला फसवण्यासाठी केलेले कृत्य स्वतःच्याच अंगावर आलेली आहेत, अशी काही उदाहरणं आहेत. म्हणून कपट नीतीचा अवलंब करू नका. स्वतः श्रम करा आणि मोठे व्हा. त्यावेळेस आपली कीर्ती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरते, शेअर्स मार्केटमध्ये दुप्पट पैसे करून देतो म्हणून अनेक लोकांना सध्या फसवले जात आहे, मोहामुळे लोक फसत आहेत म्हणून आपण कुठेही न फसता,आपला प्रपंच करावा नेटका ,त्यावेळी सर्व बरे होईल.
असे मला वाटते.

*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपतराव*
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी, ता. मुखेड जि. नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *