कंधार ; प्रतिनिधी
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नुसार अनु.जातीच्या आरक्षणात वर्गीकरण करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली अभ्यास आयोग नियुक्त करावा.३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अभ्यास आयोग नियुक्त न केल्यास सकल मातंग समाज आणि विविध संघटनांच्या वतीने ४ सप्टेंबर २०२४ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा कंधार तहसिल कार्यालय मार्फत मुख्यमंत्री,एकनाथ शिंदे यांना मातंग समाजाच्या वतीने आज दि .२१ ऑगस्ट रोजी देण्यात आला .
महाराष्ट्रात अनु.जाती प्रवर्गात 59 जाती असून या प्रवर्गासाठी 13% आरक्षण आहे. परंतु स्वातंत्र्य प्राप्ती पासून 13 % आरक्षणाचा बहुतांश लाभ अनु.जातीतील 1 ते 2 जातींनाच होत असून मातंग सह इतर जाती आरक्षणाच्या पर्याप्त लाभा पासून दूर आहेत. त्यामुळे मातंग आणि इतर जाती अधिक अधिक गरीब आणि दुर्बल होत आहे. संविधानातील तरतूदी नुसार सर्व वंचित जाती समुंहाना संधीची समानता प्राप्त होणे आवश्यक आहे.
मागील अनेक वर्षांपासून मातंग व इतर गरीब जातींना आरक्षणाचा पर्याप्त लाभ मिळावा आणि या जातींना मुख्य प्रवाहात येणे शक्य व्हावे याकरिता अनु.जातीच्या आरक्षणात वर्गीकरण करावे यासाठी मातंग समाज संघर्ष करीत आहे. सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून आपल्या सरकारने यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यासाठी अभ्यास समिती नेमली आहे. परंतु एक वर्षापासून सदरहू समितीचे काम अतिशय मंद गतीने सुरू असून सदरहू समिती मध्ये केवळ मातंग समाजाचे सदस्य असल्याने ही समिती अनु.जातीच्या उपवर्गीकरणाला न्याय देऊ शकत नाही. अनु.जातीच्या उपवर्गीकरणासाठी अनु.जातींचा जात निहाय शैक्षणिक व नोकरीतील प्रतिनिधित्व तसेच सर्व जातींचा सामाजिक व आर्थिक अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी निष्पक्ष, वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक अभ्यास करून उपवर्गीकरणाची शिफारस करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली अभ्यास आयोग नियुक्त करणे आवश्यक आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाने दि.1/8/2024 रोजी अनु.जातीच्या आरक्षणात वर्गीकरण करणे अर्थात अनु.जातीचे उपवर्गीकरण करणे संदर्भात राज्याला पूर्ण अधिकार असल्या बाबतचा निर्णय दिला असून राज्याने त्यासाठी राज्यातील अनु.जातींचा वस्तुस्थिती जन्य imperical data गोळा करून वंचित जातींना प्राधान्य क्रमाची वागणूक देण्यासाठी उप वर्गीकरण निश्चित करावे असा निर्णय दिला आहे.
सबब सकल मातंग समाज, जिल्ह्याच्या वतीने नम्र विनंती आहे की, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नुसार अनु.जातीच्या आरक्षणात वर्गीकरण करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली अभ्यास आयोग नियुक्त करावा. 31ऑगस्ट 2024 पर्यंत अभ्यास आयोग नियुक्त न केल्यास सकल मातंग समाज आणि विविध संघटनांच्या वतीने 4 सप्टेंबर 2024 रोजी आझाद मैदान, मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. तरी याची नोंद घेऊन यापुढे ही मातंग आणि वंचित जातींना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी समस्त मातंग समाज बांधवाच्या वतीने करण्यात आली .
यावेळी साईनाथ मळगे – (संस्थापक अध्यक्ष- संयुक्त-ग्रुप महाराष्ट्र राज्य) ,अरुण वाघमारे , संदीप मळगे ,साईनाथ जोगल ,नागोराव वाघमारे, विकास कांबळे ,रमेश पवार ,मारोती पवार , सिताराम साकळे ,
मनोहर गौरकर , सुरेश मध्यबैनवाड ,शिवम तोंडचिरे , बाबु भैलै , आदीसह समाज बांधव उपस्थित होते .