तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत श्री संत निवृत्ती महाराज विद्यालयाच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी.

 

कंधार/प्रतिनिधी

तालुकास्तरीय शालेय १४,१७,१९ वयोगटातील मुलांच्या कुस्ती क्रिडा स्पर्धा दि.२८ ऑगस्ट रोजी श्री शिवाजी कॉलेज नवरंगपुरा कंधार येथे आयोजित करण्यात आल्या.शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. कंधार येथील श्री संत निवृती महाराज विद्यालय भवानीनगर कंधारच्या विद्यार्थ्यांनी १४ वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत ४८ किलो गटात सम्यक हैबते यांनी तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला.५२ किलो किलो वजन गटात रितेश वाघमारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.दोन्हीही विद्यार्थ्यानी यश संपादन केले.दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव बाबूराव पाटील गीरे,मुख्याध्यापक बाबुराव शिंदे,क्रिडा मार्गदर्शक नवनाथ तोरणे,गोटमवाड डि.के.,शिंदे जे.बी.,जोगपेठे एस.डी., सौ.कविता अवटे,कल्याणकर एन.व्ही.,कदम जतीन,हणमंते ए.व्हीं.,बालाजी देवकांबळे,माधव बरुरे सह सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेछा दिल्या.यशस्वी विद्यार्थ्यांना बहूमोल असे मार्गदर्शन शाळेचे क्रिडा शिक्षक नवनाथ तोरणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *