लोहा प्रतिनिधी:
तालुक्यातील जोमेगाव येथे साहित्यरत्न, लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा युवा नेते विक्रांत पाटील शिंदे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व सर्व महामानवांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, यावेळी सभापती शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सभापती विक्रांत शिंदे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या,
यावेळी लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या विकास निधीतून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह लक्ष व सी.सी. रस्त्यासाठी 25 लक्ष रुपयाचा निधी दिला होता,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण व सी. सी रस्त्याचे भूमिपूजन यावेळी सभापती विक्रांत पाटील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सभापती शिंदे म्हणाले की आमदार शामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून जोमेगाव येथील अनेक वर्षापासून ची प्रलंबित विविध विकास कामाला एकूण निधी या पाच वर्षाच्या काळात 64 लक्ष रुपयांचा भरीव निधी देऊन ही कामे आमदार शिंदे यांनी दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली असून यापुढेही उमरा सर्कलमधील मूलभूत विविध विकास कामासाठी आमदार शिंदे यांच्या माध्यमातून भरीव निधी दिला जाणार असल्याची ग्वाही यावेळी सभापती शिंदे यांनी बोलताना दिली,
यावेळी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले याप्रसंगी जोमेगावच्या सरपंच श्रीमती कमलबाई संभाजी शिंदे,माजी सरपंच आदिनाथ पाटील जोमेगावकर,माजी सरपंच पुरभाजी शेटे, माजी सरपंच कोंडीबा गव्हाणे,ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पाटील,अंताजी शेटे, रोजगार सेवक मनोहर भुरे,शालेय समिती अध्यक्ष बालाजी पाटील, पोलीस पाटील मारुती पांचाळ, जयंती मंडळाचे अध्यक्ष माधव गव्हाणे, सचिन गव्हाणे, संजीव गव्हाणे, सह गावकरी, जयंती मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.