जयंती मधील लेझीम पथकाचे सर्वत्र कौतुक..
*हाळदा : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ सभागृहाचे काम मार्गी लागले नाही. ही बाब गावकऱ्यांसाठी योग्य नसून आता काही दिवसातच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहाचे काम पूर्ण होईल या सभागृहासाठी मी निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन कंधार लोहा मतदार संघातील लोकनेत्या, शेतकरी कामगार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे यांनी केले. त्या हाळदा येथील सार्वजनिक जयंती सोहळ्याच्या जाहीर सभेत बोलत होत्या. प्रारंभी आशाताई शिंदे यांच्या हस्ते लाल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
नुकतेची हाळदा येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य कैलास मंदावाड हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शोभाताई हणमंतराव हाळदेकर, उपसरपंच साहेबराव वसुरे, सचिन पा. शिंदे, कमल किशोर बुरपल्ले, हनुमंतराव हाळदेकर,पोलीस पाटील विलासराव बुरपल्ले, माली पाटील रावसाहेब पा. शिंदे, बळीराम यलमीटवाड शहाजी पा.शिंदे, शेख गुलाम, साहेबराव पा. शिंदे, विजय मंदावाड, सुधाकर बुरपल्ले, शिवाजी चक्रधर, भगवान सूर्यवंशी, पंडित पा.वसुरे, नागोराव बुरपल्ले, शेषराव सूर्यवंशी, राहुल गर्जे, दीपक कांबळे, विलास सूर्यवंशी, निरंजन वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आशाताई शिंदे म्हणाल्या की, हाळदा येथील नवयुवक मंडळाने जयंतीच्या निमित्ताने हाती घेतलेले उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून तरुण पिढीने आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी पुढे येऊन आपला समाज शिक्षणाकडे लक्ष द्यावे आणि त्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आशाताई शिंदे यांनी जयंती मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या लेझीम पथकाचे कौतुक करत लेझीम पथकातील सर्व विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव बैलके यांनी केले. तर आभार विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सोशल मीडिया अभिजीत कांबळे हाळदेकर यांनी मानले. सभेनंतर अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्राची मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्याने ढोल ताशाच्या गजरात आणि लेझीम पथकाच्या साह्याने काढण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष मुकुंद कांबळे, उपाध्यक्ष बालाजी कवडीकर सचिव उद्धव बैलके, सहसचिव माधव कवडीकर, कोषाध्यक्ष शिवलिंग मोरे, भीमराव वाघमारे, सुभाष वाघमारे, रामदास मोरे, संजय वाघमारे, यादव वाघमारे, सिद्धेश्वर कांबळे, सुधाकर कांबळे, तुकाराम कवडीकर, जीवन वाघमारे, जितेंद्र बैलके, उद्धव कांबळे, माधव टोमके, पंकज जाधव, दशरथ बैलके यासह जयंती मंडळातील सर्व नवयुवकांनी परिश्रम घेतले.