मन्याड खोर्‍या सहित महाराष्ट्राभर ऋषभ राजांचा बैलपोळा धुमधडाक्यात

 

कंधार ; प्रतिनिधी

भारतीय संस्कृतीत सण-उत्सवाचे महत्व अगाध आहे.प्रत्येक वर्षी सणासुदीच्या काळात संस्कृतीचे जतन करतांना प्रत्येक भारतीयांना आनंदाने आकाश ठेंगणे वाटते.आमदा मन्याड खोर्‍या सहित अख्या महाराष्ट्रभर बैलपोळा हा सण आनंदात साजरा होण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातले जवळपास सर्वच धरणे १००% भरले असून आपल्या मन्याड नदीवरील लिंबोटी येथे असलेले अप्पर मानार प्रकल्प म्हणजे तुकाईच्या माळाला असलेले छ. शिवाजी धरण १००% तुडूंब भरल्याने त्या धरणाची दोन-तीन दरवाजे उघडल्याने बारुळ (वरवंट) येथील लोअर मानार धरणाचे १७६ स्वयंचलित गेट वाहू लागले.शेतीतली पिके बर्‍यापैकी आल्याने मव्हा शेतकरी राजा आनंदात आहे.

आमदा बैलपोळ्यांच्या साज-श्रृंगाराची दुकाने कंधार शहरातील ऐतिहासिक अशा छ.शिवरायांच्या चौकात थाटल्याने बाजार भरुन वाटतो आहे.शिंगावर परिधान करणारी खोबळे, झूली,मटाटी, बाशिंग, मोऱ्हकी,कासरा,शिंगास रंगीत करणारे वाॅर्निश, पाठीवर ठस्से मारण्यसाठी काचकोरी रंग, तोडे आदी साज-श्रृंगार साहित्याने दुकाने कृषक राजांची नजर आकर्षित करते आहे.भगवान हणुमंत रायाला प्रदक्षिणा करुन आल्यानंतर वखर, नांगर, तिफण,सरते,पळस वृक्षाची फांदी,अवजाराचे सुटे पार्ट,कुदळ फावडे, वावडी,फास,फाळ आदी अवजाराचे बाजेवर ठेवून पुजन करुन पुरणपोळीचे नैवद्य दाखवून बैलाचे लग्न लावण्याची पध्दत पोळा सणानिमित्त ग्रामीण भागात असते.बैलपोळा सण आमदा शेतकरी राजा उत्साहात साजरा करण्याच्या तयारी लागले आहेत.

बैलपोळा २ सप्टेंबर २०२४ रोजी सोमवारी व ७ सप्टेंबर २०२४ श्री गणेश चतुर्थी शनिवारी आल्याने येत्या सोमवारचा बाजार अगदी फुलुन जाणार आहे.

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *