शिक्षक महासंघाच्या *कार्याध्यक्षा आमदार मा.उमाताई खापरे* यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे *शिक्षण संचालक (प्राथमिक) मा श्री शरद गोसावी* साहेब यांच्याशी राज्यातील खाजगी प्राथमिक शाळा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा संपन्न झाली.शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथे संपन्न झालेल्या सहविचार सभेस शिक्षण उपसंचालक राजेश शिंदे, अधीक्षक अमोल पवार उपस्थित होते.यावेळी शिक्षक महासंघाचे *मुख्यसचिव* विठ्ठल उरमुडे
*राज्य संघटनमंत्री* कृष्णा हिरेमठ
*उपाध्यक्ष* ज्ञानेश्वर गायकवाड
*सहसचिव* राजेंद्र कोरे, विकास थिटे
*राज्य प्रसिद्धीप्रमुख* नंदकुमार हंबर्डे
*कार्याध्यक्ष* अन्सार शेख *सचिव* शेखर उंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. पुढील मागण्यांच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. शिक्षण संचालक शरद गोसावी साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
🔴 RTE नुसार प्राथमिक शाळांना पाचवी व आठवीचा वर्ग जोडणे.
🔴 मुख्याध्यापकांना अर्जित रजेच्या रोखीकरणाचा लाभ देणे.
🔴 150 विद्यार्थी संख्येला स्वतंत्र मुख्याध्यापक पद मंजूर करणे.
🔴 प्रलंबित सेवकसंच दुरुस्ती करणे.
🔴 आधार कार्ड नसलेले विद्यार्थी तपासणी करून सेवक संचासाठी ग्राह्य धरणे.
🔴 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पदे पूर्ववत मंजूर करणे.
🔴 खाजगी प्राथमिक शाळांच्या बालवाडी यांना सेवाशर्ती नियम लागू करणे.
🔴 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना 10/20/30 ही आश्वासित प्रगती योजना लागू करणे.
🔴 100% वैद्यकीय बिलांची प्रतिकृती देणे.
🔴 कॅशलेस योजना लागू करणे.
🔴 मागील वर्षीच्या खर्चावर चालू वर्षी वेतनेतर अनुदान मंजूर करणे.