राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या समवेत होणार कॉम्रेड उज्वला पडलवार यांची संस्मरणीय भेट : लोकमतच्या सखी मंचच्या वतीने राज्यातील 25 महिलांचा होणार गौरव

 

नांदेड : महिला सबलीकरणासाठी गेल्या अनेक वर्षापासून भरीव योगदान देणाऱ्या महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील 25 महिलांचा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असून राष्ट्रपती सोबत संस्मरणीय भेटीच्या सोहळ्यात नांदेडच्या कॉ. उज्वला पडलवार यांचा समावेश करण्यात आला आहे . दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी मुंबई येथील राजभवनात हा दिमाखदार सोहळा पार पडणार असल्याची माहिती लोकमत सखी मंचच्या वतीने देण्यात आली आहे .

कष्टकरी ,शेतकरी ,आशा वर्कर, गटप्रवर्तक, घरकामगार ,असंघटित कामगार महिलांच्या न्याय हक्कासाठी गेल्या एक दशकावून अधिक काळ संघर्ष करणाऱ्या कॉम्रेड उज्वला पडलवार यांच्या कार्याची पावती म्हणून दैनिक लोकमत संखी मंचच्या वतीने महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांच्या हस्ते दिनांक 3 सप्टेंबर रोजी गौरव करण्यात येणार आहे .

राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी आणि सशक्तीकरणासाठी योगदान देणाऱ्या गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील केवळ 25 महिलांचाच सन्मान करण्यात येणार असून यात कॉम्रेड उज्वला पडलवार यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे कष्टकरी, शोषित, पीडित , वंचितांच्या न्याय हक्कासाठी गाळलेल्या घामाचा सुगंध थेट आता राजभवना पर्यंत पोहोचणार आहे.

त्यामुळे या निवडीबद्दल कॉम्रेड उज्वला पडलवार यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ज्यांच्यासाठी त्यांनी कष्ट उपसले त्या सर्व कष्टकरी महिला , असंघटित कामगार महिलांकडून अभिनंदन होत आहे.

One thought on “राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या समवेत होणार कॉम्रेड उज्वला पडलवार यांची संस्मरणीय भेट : लोकमतच्या सखी मंचच्या वतीने राज्यातील 25 महिलांचा होणार गौरव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *