नांदेड जिल्ह्यातील एकुण ९३ पैकी ४५ मंडळांमध्ये मागील २४ तासात अतिवृष्टी

 

नांदेड ; काल दिनांक ०१ सप्‍टेंबर २०२४ रोजी नांदेड जिल्ह्यातील एकुण ९३ मंडळापैकी नांदेड,बिलोली, मुखेड,कंधार,लोहा,हदगाव,भोकर,देगलूर,मुदखेड,हिमायतनगर,अर्धापूर,नायगांव खै. या बारा तालुक्यातील ४५ मंडळांमध्ये मागील २४ तासात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. यामध्ये अर्धापुर तालुक्यातील अर्धापुर मंडळात सर्वाधिक १७०.५० मिमी. पावसाची नोंद झालेली आहे.
किनवट तालुका:
१. मौजे कंचली येथील साहेबराव गंगाराम जाधव यांची एक गाय पुरात वाहत जाऊन मयत झाली.
२. शेषराव भोजू चव्हाण – नंदगाव तांडा – गाय – वाहून गेली- Dead Body सापडली नाहीं.
३. मोजे मांडवा की येथील शेतकरी विकास विलास साळवे यांचे एक वासरू काल सतत पडणाऱ्या पावसाने नाल्या कडे मयत आवस्थेत भेटली.
अर्धापुर तालुका:
१. सांगवी खू येथील पाणी पातळीत वाढ होत आहे
२. मेंढला (बु ) पुलावरुन पाणी वाहत आहे
३. सद्यस्थितीत मेंढला शेलगाव व सांगवी या गावाचा अद्याप ही संपर्क तुटला आहे.. दांडेगाव नदी वाहते व इतर ओढ्याच्या प्रवाहाचे पाणी वाढले आहे.. सद्यस्थितीत कोणतीही हानी नाही.
उमरी तालुका:
१. दुर्गानगर ता उमरी येथे घरपडझड
२. महाटी तालुका उमरी येते पूर परिस्थिती पाहणी तहसीलदार सोलंकर सर, केली यावेळी कृषी अधिकारी मीरासे साहेब, तलाठी खानसोळे सर, वाघमारे सर, पवार सर, कोतवाल कमळे व शेतकरी उपस्थित.
३. मौजे हुंडा गप ता. उमरी श्री. प्रशांत गंगाधर बाचलवाड यांचे पाऊस पाण्याने वाहून दोन मेंढ्या मयत
४. घर पडझड बेलदरा तालुका उमरी
नांदेड तालुका:
१. मौजे राहेगाव ते किकी या दोन गावामधील पुलावरून पाणी जात आहे .लोकांना जाता येत नाही. पुलावरून पाणी कमी होत नाही तोपर्यंत कोणीही पूलावरून जाणे येणे करू नये दोन्ही गावातील सर्व अशा ग्रामस्थांना सूचना प्रशासनाकडून द‍िल्‍या आहेत.
२. पासदगाव येथे नांदेड मालेगाव रोड ला पाणी लागले आहे. पूलावरून पाणी कधीही वाहू शकते. दोन्ही बाजूंनी ट्रॅफिक बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तलाठी त्या ठिकाणी थांबून आहेत.
३. दुपारी ४ वाजताच्‍या दरम्‍यान पासदगाव पुलावरून पाणी जात होते. प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी वारंवार सांगून सुद्धा एका व्यक्तीने प्रशासनाचे काहीच न ऐकता पुल क्रॉस करण्याच्या प्रयत्नात तो वाहून गेला आहे.
४. गोदावरी नदी काठावरील वसरणी पंचवटीनगर साईबाबा कमान जवळ एका इमारतीमध्‍ये दुस-या मजल्‍यापर्यत पाणी गेले होते व पाणी वाढत होते सांगळे व इतर दोन व्‍यक्‍ती इमारतीमध्‍ये अडकलेल्‍या होत्‍या प्रशासनाकडून शोध व बचाव कार्यवाही करुन सर्वाना सुखरुप बाहेर काढले.
कंधार तालुका:
१. बोळका हाडोळती रोडवरील पुलावरून पाणी जात आहे
२. कंधारेवाडी येथे पुलावरून पाणी वाहत आहे.
३. जाकापुर ते गोणार रस्ता 48 तासांपासून बंद आहे
लोहा तालुका:
१. मौजे कापशी खुर्द येथील 10 घरामध्ये अतिवृष्टीमुळे पाणी जाऊन संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झालेले आहे.
हदगाव तालुका:
१. करमोडी गावात अशोक गोविंद अचलखांबे यांच्या घराची पडझड झाली आहे.
२. वायपणा बु. धर्मा कोंडबा गव्हाणे यांच्या घराची पडझड झाली आहे.
३. ब्रम्हवाडी येथील पुष्‍पाबाई गंगाराम कोकणे यांच्या घरांची भिंत कोसळून नुकसान झाले आहे
४. मोजे हारडफ ता. हदगाव येथील नानेश्वर मोरे यांची 01 मैस पुराच्या पाण्यात वाहून मयत झाली आहे
५. उंचाडा येथे गावाजवळ कयाधु नदीच्‍या परीसरात जवळपास २५ लोक अडकले होते जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय, नांदेड कडून राज्‍य आपत्‍ती प्रतिसाद दल SDRF ची तुकडी त्‍या ठिकाणी पाठवून शोध व बचाव कार्य करुन २५ जणांना पुरातुन सुखरुप बाहेर काढले..
६. हास्‍तरा गावात कयाधु नदीच्‍या पुरामध्‍ये एक व्‍यक्‍ती अडकलेला होता त्‍याला पुरातुन बाहेर काढण्‍याची कार्यवाही प्रशासनाकडून चालु आहे.
नायगाव तालुका:
१. नायगाव तालुक्यातील अनेक गावात अशी परिस्थिती आहे. परंतू लोकांना सतर्क करून सर्व कर्मचारी अलर्ट कऱण्यात आले आहेत.संबंधीत पुलांवरील वाहतुक बंद केली आहे व सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
२. कुंचेली येथील नागरिकांना पूरपरिस्थिती बाबत..जागृती व माहिती देताना
३. जुनी कुंचेली या गावांमध्ये मन्याड नदीचे पाणी शिरत आहे.. लोकांना पुनर्वसन झालेल्या नवीन कुंचेली येथे सुरक्षित स्थळ येथे जाण्याचे आव्हान केले आहे
धर्माबाद तालुका:
१. सज्जा सालेगाव ध.अंतर्गत मौजे सालेगाव ध.ते निमटेक मार्गातील ओढ्यावरचा फुल तुटल्यामुळे सदर रस्त्यावरून जाण्याचा संपर्क तुटला आहे.तरी इतर मार्गावरील दोन रस्ते चालू आहेत.
२. बामणी आणि विलेगाव च्या पोलीस पाटील यांना कळवले आहे की कोणतेही वाहन या मार्गाने येऊ देऊ नये रस्ता बंद झाला म्हणून
३. मौजे सिरजखोड येथील गोदावरी नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने बामणी,विळेगाव थडी, मनुर ,संगम,ह्या गावचा धर्माबाद कडे येणारा रस्ता बंद झाला आहे व धर्माबाद कडे येणारा संपर्क तुटला आहे,सध्या पर्यायी मार्ग हुनगुंदा -कुंडलवाडी मार्ग चालू आहे .

हिमायतनगर तालुका:
१. मौजे कामारी तालुका हिमायतनगर येथे लाखाडीचे नदी बॅक वॉटर गावाच्या जवळ आलेले आहे
पण गावात अद्याप पाणी गेलेले नाही तलाठी व मंडळ अधिकारी हे उपस्थित असून व लोकांना
सतर्कतेच्‍या सूचना देण्यात आल्या आहेत.. कामारी ते हदगाव रस्ता बंद आहे.सद्यस्थितीत पाऊस
थांबलेला आहे.
भोकर तालुका:
१. शंकर विठ्ठत करेवाड रा. पिंपळढव ता.भोकर यांची गाय कालच्या पावसाने मयत झाली आहे
—————————————————————————————————————-
हवामान खात्‍याकडून ४ वाजता प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार नांदेड ज‍िल्‍ह्याला रात्री ७.०० वाजेपर्यत रेड अर्लट सांगीतलेला आहे तरी कोणीही नदी,नाले,पाण्‍याचे वाहते प्रवाहातून जाऊ नये व वाहने त्‍यामधुन नेऊ नये असे आव्‍हान ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण ज‍िल्‍हाधि‍कारी कार्यालय नांदेड करुन करण्‍यात येते आहे.

——- नांदेड ज‍िल्‍हयातील द‍ि.०२/०९/२०२४ रोजीची पाणी पातळी ——–
ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण ता.पुसद जि.यवतमाळ पाणी पातळी अहवाल
दिनांक ०२/०९/२०२४ वेळ ०४.०० वा.
पाणी पातळी- ४३९.४० मिटर उपयुक्त पाणीसाठा- ८१६.७५४४ द.ल.घ.मी. २८.८५ Tmc
टक्केवारी- ८४.७२ % मागील दोन तासातील पाणी आवक (३.५४०) द.ल.घ.मि. ०.१२५ Tmc
येवा (४९१.६० क्युमेक्स ) १७३६१ क्युसेक्स सद्यस्थितीत सांडव्याची सर्व वक्रद्वारे बंद आहेत
शंकरराव चव्‍हाण व‍िष्‍णुपरी प्रकल्‍प नांदेड S.C.V.P. Nanded
दुपारी १.३० वाजता आणखी एक धरणाचा दरवाजा उघडलेला असुन या वेळेदरम्‍यान एकुण १४ दरवाजे उघडलेले आहेत व २०८६३५ क्‍युसेक्‍स Cusecs पाण्‍याचा विसर्ग चालु आहे. पाणी साठा ९४.२३% आहे.
अपर मानार ल‍िंबोटी धरण ता.लोहा-Upper Manar Project
एकुण पंधरा पैकी ९ दरवाजे उघडलेले आहेत व १२४०० क्‍युसेक्‍स Cusecs पाण्‍याचा विसर्ग चालु आहे.
लोअर मानार बारुळ धरण ता.कंधार-lower Manar Project
ल‍िंबोटी धरणातुन सोडलेला विसर्ग बारुळधरणातून जात आहे.बारुळ धरणाला अॅटोमॅटीक गेट आहेत.त्‍यामुळे येणारा व‍िसर्ग जशाला तसा पुढे जातो आहे. सध्‍या १२३५० क्‍युसेक्‍स Cusecs पाण्‍याचा विसर्ग चालु आहे.
बळेगावं हाय लेव्‍हल बॅरेज Balegaon High level Barrage
एकुण १४ दरवाजे उघडलेले आहेत व ३३१७१८ क्‍युसेक्‍स Cusecs पाण्‍याचा विसर्ग चालु आहे. पाणी साठा १००% आहे.
आमदुरा हाय लेव्‍हल बॅरेज Amdura High level Barrage
सर्व दरवाजे उघडलेले आहेत व व‍िसर्ग चालु आहे. पाणी साठा १००% आहे.
बाभळी हाय लेव्‍हल बॅरेज Babhali High Level Barrage
सर्व दरवाजे उघडलेले आहेत व व‍िसर्ग चालु आहे. पाणी साठा १००% आहे.

One thought on “नांदेड जिल्ह्यातील एकुण ९३ पैकी ४५ मंडळांमध्ये मागील २४ तासात अतिवृष्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *