कंधार, (वार्ताहर ) दि.2 देशात जे बदल झाले ते युवकांनीच घडवले, आता पर्यंत ज्या ज्या क्रांत्या झाल्या त्या युवकांनीच केल्या. देशात युवकच क्रांती घडूव शकतो असे उदगार काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आ. ईश्वरराव भोसीकर यांनी युवक काँग्रेस बैठकीत युवकांना मार्गदर्शन करतांना काढले.
कंधार – लोहा विधानसभा मतदार संघ युवक काँग्रेसची बैठक रविवार दि.1 सप्टेंबर रोजी कंधार शहरातील प्रियदर्शनी कन्या शाळेत घेण्यात आली. मतदार संघाचे युवक काँग्रेस अध्यक्ष महेशभाऊ भोसीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस कंधार – लोह्याचे माजी आ. ईश्वरराव भोसीकर यांची विशेष उपस्थिती होती. या बैठकीत सर्व प्रथम नांदेडचे दिवंगत खा. वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पुढे बोलतांना माजी आ. भोसीकर म्हणाले, देशात भगतसिंग पासून ते आज पर्यंत फक्त युवकांनीच क्रांती घडून आणली आहे. युवकांनी मनावर घेतल्यावर ते कांही ही बदल घडू शकतात. युवकांच्या ताकदीवर पक्ष बळट होतो. युवक काँग्रेसची स्थापना सन 1960 साली झाली. युवक काँग्रेसचे पहिले अध्यक्ष एन.डी. तिवारी होते, अशी माहिती ही त्यांनी दिली.
युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष महेशभाऊ भोसीकर यांनी देशातील व राज्यात चालू आलेल्या घडामोडीवर व महायुती सरकारच्या हलगर्जीपणावर टीका केली. येणाऱ्या काळात लोहा – कंधार मधील युवक काँग्रेस मोठ्या ताकतीने मजबूत करून एक नवीन ओळख निर्माण करेल असा विश्वास दाखवला व लवकरच नवीन पदाधिकारी नेमून गाव तेथे शाखा करण्यात येईल. मतदार संघातील युवकांच्या कोणत्याही अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न नक्कीच करील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. यावेळी बाबासाहेब बाबर ,अजय मोरे , सुनील सुनेगावकर, बालाप्रसाद मानसपुरे, कोटबाजारचे सरपंच शेख अजीम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पाऊसाची रिपरिप सुरु असतांना ही या बैठकीत मोठ्या प्रमाणात युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक वर्ग उपस्थित होता. कंधार – लोह्यात पहिल्यांदाच एव्हड्या मोठ्या प्रमाणात युवक काँग्रेसची बैठक कधी झाली नव्हती. त्यामुळे युवक कार्यकर्त्यांनी ही प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.
*मालवण घटनेचा निषेध*
आढाव बैठक संपल्या नंतर सर्व जमलेल्या युवक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथे असलेल्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा प्रकरणाचा व बदलापूर येथे एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा विरोधात हातात फलक घेवून निषेध व्यक्त केला.