धर्मापुरी येथे शिक्षक दिन उत्साहात.

 

अहमदपूर (प्रतिनिधी ) येथून जवळच असलेल्या धर्मापुरी येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात आज दि 05 सप्टें 24 रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ होळंबे टी एल उपस्थित होते. प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध लेखक प्रा डॉ रुद्देवाड होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे प्रा डॉ रुद्देवाड यांनी आपले 11 स्वलिखीत आणि अप्रकाशित ग्रंथ महाविद्यालयाच्या ग्रंथालयास भेट म्हणून ग्रंथपाल प्रा दराडे जी एस यांच्या सुपुर्द केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सांस्कृतिक विभाग अहवाल शैक्षणिक वर्ष 2023 – 24 प्रकाशित करण्यात आला. गतवर्षी महाविद्यालयात राबवलेल्या 38 कार्यक्रमाचे संकलन आणि त्याची ओझरती माहिती यात आहे. हा 60 पानांचा अहवाल सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा जंगिटवार व्ही आर आणि प्रा भगवान आमलापुरे यांनी तयार केला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा मुंडे जी एस यांनी केले. सुत्रसंचलन प्रतिक्षा चाटे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता साने गुरुजी यांच्या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या वंदनेने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बळिराम पेंटुळे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *