वीरशैव लिंगायत समाजातील तरुणांना स्थैर्य व दिशा देण्यासाठी सन्मान यात्रेत सहभागी व्हा* *प पू आचार्य गुरुराज स्वामी यांचे जाहीर आवाहन;

राष्ट्रसंताच्या दर्शनाने भक्ती स्थळा पासून वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचा शानदार शुभारंभ सोहळा संपन्न

 

अहमदपूर दि.05.09.24 वीरशैव लिंगायत समाज हा प्रामाणिक, कष्टाळू, स्वाभिमानी, निर्वेशनी, चारित्र्यसंपन्न असून सर्वच क्षेत्रांमध्ये अग्रगण्य समाज आहे . परंतु राजकीय पटलावर तो काजव्याप्रमाणे दिसत आहे त्यामुळे समाजाचे संघटनीकरण आणि नव तरुण तरूणीना दिशा व त्यांच्या हाताला सर्वतोपरी काम देण्याच्या हेतूनेच वीरशैव लिंगायत सन्मान संवाद यात्रेत तरुण तरुणींनी व समाज बांधवांनी संवाद यात्रेचे प्रमुख खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांना बळ द्या असे आग्रही प्रतिपादन भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांनी केले.

ते वीरशैव लिंगायत सन्मान संवाद यात्रा सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी भक्ती स्थळ येथे आयोजित कार्यक्रमात आशीर्वचन प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प.पू.गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगावकर, प पू डॉ वीरपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, सन्मान संवाद यात्रेचे प्रमुख राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजपा च्या अर्चनाताई पाटील चाकूरकर, प्रदेश उपाध्यक्ष बसवराज पाटील कोळखेडकर,भाजपाचे माजी जिल्हाध्य गुरुनाथ मगे, संयोजक नितीन शेटे, राष्ट्रीय जंगम संघटनेचे अध्यक्ष श्रावण जंगम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर, भाजपा उद्योग आघाडीचे प्रांत संयोजक अमरनाथ खुरपे, सिनेट सदस्य एड युवराज पाटील, राजाभाऊ मजगे, ओमभाऊ पुणे, शिवशंकर धुपे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. अजित गोपछडे म्हणाले की वीरशैव लिंगायत समाजातील विविध घटकातील समाजांचे एकत्रीकरण करून त्यांच्यामध्ये बळ येण्यासाठी सदरची सन्मान यात्रा असल्याचे सांगून भक्ती स्थळ हे माझे ऊर्जा स्तोत्र असून समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यात लिंगायत समाजातील गरीब आणि होतकरू मुलांना पुणे मुंबई येथे वस्तीगृहाची निर्मिती करणे. समाजाला ओबीसीत टाकणे,लिंगायत तरुणांच्या हाताला काम देणे . सदरचे सन्मान संवाद यात्रा श्री क्षेत्र भक्ती स्थळ ते श्री क्षेत्र शक्ती स्थळ अशी दि.5 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर अशी 17 दिवस चालणार असल्याचे सांगितले. यात असंख्य मागण्या लावून धरणाच्या हेतूने आपापसातील मतभेद विसरून या संवाद यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आग्रही आवाहन डॉ. अजित गोपछडे यांनी केले.

संवाद सन्मान यात्रेचा शुभारंभ माऊलीच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या चरणामध्ये नतमस्तक होऊन या संवाद यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बालाजी पाटील चाकूरकर यांचे आणि अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी मनोगत व्यक्त केले
प्रास्ताविक राजकुमार मजगे यांनी सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी तर आभार प्रा. प्रताप पाटील यांनी मानले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा त्यात किर्तन केसरी शि भ प भगवंतराव बाबा पाटील चाभरगेकर, डॉ. ऋषिकेश पाटील, उमाकांत कासनाळे, महाराष्ट्र शासनाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या आशा रोडगे- तत्तापुरे, सामाजिक कार्यकर्ते सहदेव होनाळे, वीरभद्र गंगाधर शेळके आणि चाकूर तालुक्यातून शिभप चंद्रकांत स्वामी महाराज, चापोलीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रभूप्पा होनराव, उद्योजक शिवकुमार होळदांडगे, उद्योजक माधवराव हाळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ पाटील यांचा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

संवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी एड निखिल कासनाळे, अभय मिरकले,रवि महाजन, संदीप चौधरी,प्रा विश्वंभर स्वामी शिवकुमार उटगे, राजकुमार कल्याणे, प्रा. धीरज शेटकार, अक्षय काडवादे, प्रशांत बिबराळे, गणेश शेटकार,शंकर भुरे यांच्या संवाद यात्रेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *