मुखेड:तालुक्यातील दापका (राजा) येथील श्री संत नामदेव महाराज विद्यालयातील विद्यार्थिनी कु. ऋतुजा सुधाकर केंद्रे ही इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाली आहे. या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती चक्रावतीबाई राठोड, सचिव गंगाधरराव राठोड, आमदार डॉ. तुषार राठोड, गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे, केंद्रप्रमुख बालाजी बनसोडे, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सायलू करेवाड, मुख्याध्यापक शिवाजी डावकरे यांनी अभिनंदन केले आहे.
या यशाबद्दल ऋतुजा केंद्रेचा नुकताच शाळेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी डावकरे, वसंत चव्हाण, बुद्धाजी किनवाड, दादाराव आगलावे, सतीश मस्कले, सचिन बादेवाड, प्रदीप दापकेकर, रवी हादवे, सुलींदर गायकवाड, चंद्रकांत तेलंगे,अशोक धुळशेट्टे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थिती होते. कु.ऋतुजा केंद्रेचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.