प्रतिनिधी =लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष विकासाभिमुख आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या नांदेड येथील स्मेरा निवास्थानी लोहा तालुक्यातील मौजे उमरा सर्कल मथील माजी सरपंच आनंदराव वाघमारे ,पोलीस पाटील बाबाराव पा.सिरसाट मुकदम ,विनायक पां.सिरसाट,ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील ,मुबीन शेख ग्रा.पं.सदस्य,दिनाजी गवाले, बालाजी पा.शिंदे, शैलेश पा.शिरसाट, विकास पा.शिंदे, सोपान पा.वडजे,माधव पा.सिरसाट,किरण पा.सिरसाट, गंगाधर पवार, शंकर पा.बोडके, लक्ष्मण शिरसाट,किशन सिरसाट, ज्ञानेश्वर पा.सिरसाट, बालाजी पा.भरकडे,मनोहर पा.शिरसाट, सुरेश पा.सिरसाट, आनंदा पांचाळ,आनंद वरपडे, रावसाहेब पा. शिंदे,शंकर पा.ढगे,मारोती पा.पवळे,वाजीद पठाण,गौतम सोनटक्के, भिमराव पटेकर,बाबु वाघमारे,दिपक पटेकर, सुनिल निलपत्रेवार, शेषेराव जोगदंड यांनी आमदार श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे व लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत दादा शिंदे यांच्या विकासाभिमुख कार्यावर व खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून काल दि. 6 सप्टेंबर रोजी सौ.आशाताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
सौ.आशाताई शिंदे यांनी यावेळी पक्षप्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे शाल पुष्पहार देऊन सत्कार करून सर्वांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी शेकाप च्या महाराष्ट्र महिला प्रदेशअध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्यां आशाताई शिंदे बोलताना म्हणाल्या कि आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून लोहा कंधार मतदार संघात अनेक मूलभूत विकास कामे पूर्ण झाले असून उमरा सर्कल मध्ये ही अनेक विकास कामे झाली असून आमदार शिंदे यांच्या खंबीर नेत्रत्वावर व विकासाभिमुख कार्यावर विश्वास ठेवून आज उमरा सर्कल मधील अनेक कार्यकर्त्यानी शेकाप मध्ये जाहीर प्रवेश केला आहे, आमदार शिंदे व मी यापुढेही उमरा सर्कल च्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कट्टीबद्ध असल्याची ग्वाही यावेळी आशाताई शिंदे यांनी दिली,
तालुक्यातील उमारा सर्कल मधील शेकडो कार्यकर्त्यानी सवय्फूर्तीने आमदार श्यामसुंदर शिंदे, आशाताई शिंदे, सभापती विक्रांत पाटील शिंदे यांच्या विकासाभिमुख खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकाप मध्ये जाहीर प्रवेश केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार शिंदे कुटुंबियांचे पारडे जड झाले आहे,याप्रसंगी खरेदी विक्री संघांचे सभापती स्वप्निल पा,उमरेकर,धनज चे सरपंच पंजाबराव पा.माळेगावे, सुगावचे उपसरपंच विजय पा.जाधव,साईनाथ पा.सावळे,अविनाश पाटील उमरेकर, बालाजी पा.जाधव,बालाजी पा.शिंदे सह इतर कार्यकर्ते पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.