भारतीय ज्ञानपीठ या संस्थेने दामोदर मावजोना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घ्यावा देविदास फुलारी यांची मागणी

 

नांदेड : ज्ञानपीठ हा अतिशय सन्मानाचा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार असून
तो भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे दिला जातो.
इ. स. 1944 मध्ये प्रसिद्ध उद्योगपती साहू शांतीप्रसाद जैन यांनी या संस्थेची स्थापना केली.
भारतीय भाषांमध्ये अनन्यसाधारण निर्मिती करणाऱ्या लेखकास व त्याच्या एकूणच साहित्यिक कर्तुत्वास हा पुरस्कार दिला जातो.

भाषेच्या संदर्भात ज्या लेखकाची अभिवृत्ती औदार्याची आहे. अशाच लेखकाला हा पुरस्कार दिला जातो. पण अलीकडे गोव्यातील जेष्ठ कोकणी लेखक दामोदर मावजो यांनी
गोव्यातील राजभाषा कायद्यात मराठी भाषा नको असे विधान करून भाषावाद तर निर्माण केलाच आहे शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील भाषा विकृतीही दाखवून दिली आहे. मावजो हे अतिशय दांभिक लेखक असून उदगीर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी मराठी प्रेम बोलून दाखवले होते पण ते प्रेम पुतना मावशीचे ठरले. चांगला लेखक हा भारतातील सर्व भाषांना भाषा भगिनी मानत असतो. बऱ्याच वेळा विशिष्ट कारणासाठी किंवा एखादी भूमिका घेऊन लेखक संबंधित पुरस्कार त्या संस्थेकडे परत करतात. तेव्हा भारतीय ज्ञानपीठ संस्थेने भाषा औदार्याची एक भूमिका घेऊन दामोदर मावजो यांना दिलेला 57 वा ज्ञानपीठ पुरस्कार परत घ्यावा. अशी विनंती साहित्यिक देविदास फुलारी यांनी करुन मावजो यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *