प्रतिनिधी=लोहा-कंधार मतदारसंघातील व नांदेड जिल्ह्यातील अनेक मंडळात अतिवृष्टीचा संततधार पाऊस झाल्यामुळे अनेक हेक्टर वरील शेत जमिनी खरडून गेल्या व अनेक हेक्टर वरील उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे मतदारसंघा सह नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांवर अस्मानी संकट कोसळले असून मी शेतकरी बांधवावर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मी मतदारसंघातील शेतकरी बांधवांसोबत खंबीरपणे उभा असून शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी म्हणून मी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे, मतदारसंघातील शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही सभापती विक्रांत पाटील शिंदे यांनी बोलताना दिली,
मतदारसंघात अतिवृष्टीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने हजारो शेतकरी बांधवांवर अस्मानी संकट कोसळलेले असल्यामुळे मी माझा उद्या 9 सप्टेंबर सोमवार रोजी चा वाढदिवस साजरा करणार नसून माझे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त हार तुरे फटाके, बॅनर बाजी करू नये व कार्यकर्त्यांनी आपआपल्या गावात सामजिक उपक्रम राबवून मला शुभेच्छारुपी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत पाटील शिंदे यांनी केले आहे.