पतंजली नित्य योग, भक्ती लॉन्स शाखेची महती आंतरराष्ट्रीय स्तरावर…. सोशल मीडियाद्वारे तब्बल 15 लाख लोकांपर्यंत पोहोचला नांदेडचा नित्य योग..! योगाचार्य सितारामजी सोनटक्के गुरुजी यांची माहिती

 

नांदेड: ( दादाराव आगलावे)
निशुल्क भावनेतून गेल्या आठ महिन्यांपासून ऊन पाऊस थंडी याची तमा न बाळगता व कोणत्याही दिवशी सुट्टी न घेता नियमित अखंडपणे योग साधनेचा वसा घेत योगाचार्य सितारामजी सोनटक्के गुरुजी यांनी नांदेड येथील सुप्रसिद्ध उद्योगपती व शारदा कन्स्ट्रक्शन चे सुमित मोरगे यांच्या मालेगाव रोडवरील भक्ती लॉन्स मंगल कार्यालयात अखंड योग कुंड धगधगत ठेवला आहे.

प्रचंड परिश्रम, योग साधनेतून रोगमुक्ती, प्रत्येक योग साधकाला आनंदी व सुखी आणि निरोगीमय जीवन, रोगी व्यक्तींना उत्कृष्ट मार्गदर्शन आणि मोफत आयुर्वेदिक उपचार, आणि मुख्य म्हणजे घराघरांमध्ये योगाचा प्रचार व प्रसार हे अशा विविध अंगी सूत्रांनी आपल्या आयुष्याचे सर्वस्व पणाला लावत केवळ योग हा ध्यास घेऊन योगाचार्य सितारामजी सोनटक्के गुरुजी यांनी प्रतिकूल मानसिकतून नांदेड शहरामध्ये योगमय वटवृक्ष निर्माण केला आहे.

दररोज न चुकता सकाळी 4.30 ते 7 या वेळेत नित्यनियमाने योग शिक्षण देत प्राणायाम, ध्यान, विविध योगासने, विविध व्यायाम असे जवळपास सर्व मिळून 150 प्रकार घेतले जातात. ज्यामुळे योगसाधकाला सर्वांगयोग प्राप्त होतो आणि रोगी साधकाला काही दिवसातच रोगातून स्वस्थ होण्याचा प्रत्यय येतो.

गेल्या आठ महिन्यापासून हे कार्य अविरतपणे चालू असताना यात सर्वात मोठे योगदान भक्ती लॉन्स मंगल कार्यालयाचे मालक तथा शारदा कन्स्ट्रक्शन चे सर्वेसर्वा सुमित मोरगे यांचे आहे. मोरगे यांनी आपले भव्य दिव्य मंगल कार्यालय व कार्यालयातील परिसर पटांगण योगासाठी कोणतेही शुल्क न घेता अगदी मोफत उपलब्ध करून दिले आहे. पाऊस नसेल तर कार्यालयाच्या भव्य पटांगणात आणि पाऊस असेल तर मंगल कार्यालयाच्या भव्य हॉलमध्ये नियमित योगा घेण्यात येतो.

तसेच या कार्यासाठी भक्ती लॉन्स ची नित्य योग समिती ही अहो रात्र काम करत असते. विशेषतः या समितीत महिला पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग असतो. सुरुवातीला बोटावर मोजण्याइतके योगसाधकापासून सुरू झालेली ही योग शाखा आता प्रत्यक्ष रोज 200 च्या जवळपास योग साधक साधनेत सहभाग घेऊन त्याचे वटवृक्षात रुपांतर होत आहे.

 

विशेष म्हणजे रोजच्या रोज केल्या जाणाऱ्या योग साधनेचे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास 80 योगा संदर्भातल्या ग्रुप वर प्रसारित केले जाते. यात महाराष्ट्रसह भारत आणि अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, इटली तसेच पाकिस्तान या देशातील योगा ग्रुप वर नियमित प्रसिद्धी केली जाते. यात आणखी विशेष म्हणजे योग ऋषी व पतंजली योग पिठाचे सर्वेसर्वा पूज्यनीय गुरुवर्य स्वामी रामदेवजी महाराज व पूज्यनीय गुरुवर्य आयुर्वेद शिरोमणी आचार्य बाळकृष्ण महाराज यांच्या पतंजली सोशल अकाउंट वर रोज योगा अपलोड केला जातो.

केवळ सोशल मीडियातून जगभरात 15 लाख लोकांपर्यंत योग पोहचला आहे. नांदेडची भक्ती लॉन्स येथील नित्ययोग शाखा ही प्रत्येक घरात योग पोहोचवण्या करिता अखंड परिश्रमाची जन सेवेची मोठी जबाबदारी नित्ययोग समितीने उचलली आहे. भविष्यात नांदेड जिल्हा योगमय करून जिल्ह्याला मिनी पतंजली हरिद्वार तयार करण्याचा मानस योगाचार्य सीतारामजी सोनटक्के गुरुजी यांनी केला आहे. पूज्यनीय गुरुवर्य स्वामीजी महाराजांचा आशीर्वाद मिळत आहे म्हणून या कार्याला गती मिळत आहे. अशी भावना युवकाचार्य सितारामजी सोनटक्के गुरुजी यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *