सोनखेड : प्रतिनिधी
मी रितेश दिलीप दासरे वय 17 वर्षे व्यवसाय मजुरी शिक्षण राहणार किवळा तालुका लोहा मो. 8421501535 समक्ष पोस्ट सोनखेड येथे प्रत्यक्ष हजर येऊन लेखी जबाब लिहून घेण्यास सांगतों की मी वरील ठिकाणचा राहणारा असून सध्या इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असून वडिलांसोबत मजुरी काम पण करून आई-वडिलांसोबत राहून पोट उपजिविका करतो.
दि. 07/09/2024 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मी घरी हजर असताना आमच्या गावात राहणारे विष्णू बारोळे चिंटू देशमुख हे दोघे माझ्या घरासमोर आले व मला आवाज देऊन बाहेर बोलावले व म्हणाले की आम्हाला गणपती स्थापने करिता बैंड ठरवायचा आहे व तुझा बँड लावायचा आहे त्याकरिता ठरवण्यासाठी तू आमच्या सोबत ये असे म्हणून त्यांनी मला मोटर सायकल वर बसवून किंवा बस स्टॅन्ड येथील शिवा टी हाऊस येथे घेऊन गेले व तेथे त्यांनी मला बैंड साठी किती पैसे घेतोस सांग म्हणाले तेव्हा मी त्यांना सध्या माझ्याकडे बैंड वाजविण्याकरिता इतर मुलं नाहीत जर कोणी तयार झाले तर मी बँड वाजवण्याकरिता येतो व रुपये 2000 घेतो असे म्हणालो व मुलं तयार असतील तर फोन करून सांगतो असे म्हणून तेथून गावात गेलो. बैंड वाजवणारे मुलं झोपलेली होती त्यांना मी विचारणा केली असता त्यांनी नकार दिल्याने मी माझे घरी परत आलो व माझे फोनवरून चिंटू देशमुख यांना फोन करून माहिती दिली की मी उद्या बँड वाजवण्यासाठी कोणीही मुलं तयार नसल्यामुळे येऊ शकत नाही, त्यावेळी चिंटू मोरे यांचे मोबाईल वरून सचिन मोरे हा मला शिवीगाळ करू लागला, तुला काम द्यायचे नव्हते तर तू पहिले हो का म्हणालास, तू थांब आम्ही तुझ्या घराकडे येऊन बोलतो असे म्हणून फोन ठेवला व थोड्या वेळाने अंदाजे रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कृष्णा बारोळे हा माझ्या घरासमोर येऊन मला आवाज देऊन बाहेर बोलावले व मला तू आमचे काम करतो असे म्हणून आला असे म्हणून शिवीगाळ करू लागला त्यावेळी तेथे सचिन मोरे व विष्णू बारोळे हैं दोघेपण तेथे आले व त्या तिघांनी मला मांगड्या तुले माजलास काय असे म्हणून जातीवाचक शिवेगाळ केली व सचिन मोरे यांनी थापडा बुक्क्याने मारहाण केली व विष्णू बारोळे यांनी मला खाली पाडून लाथाने व त्याच्या हातातील काठ्थाने माझे पाटील पायावर मुक्कामार मारला त्यावेळी आरडा ओरड केल्याने तेथून जाणारे दिगंबर
आनंदा गायकवाड चिमणाजी संभाजी गायकवाड माझा चिंता प्रभाकर दिगंबर दासरे व माझी आई घरातून संगीता दिलीप दासरे हे सर्वजण तेथे आले त्यावेळी त्या सगळ्यांना पाहून ते तिघे मोटार सायकल वर बसून पळून गेले.
तरी मला गणपती संबंधाने बँड ठरविण्याचे कारणावरून वरील सचिन मोरे, कृष्णा बारोळे, विष्णू बारोळे यांनी मांगडग्या तु लई माजलास असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली व थापडा बुक्क्याने व काठीने मारून जखमी केले
आहे
तरी वरील तिघांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी ही विनंती आहे व घटना घडली तेव्हा अपरात्र झाल्याने आज रोजी येऊन तक्रार देत आहे.
माझ्यावरील जबाब माझ्या सांगण्याप्रमाणे लिहिला तो मी स्वतः वाचून पाहिला तो बरोबर खरा आहे.