नांदेड: येथील ‘तुलसी’ स्किन कॉस्मेटिक व लेझर क्लिनिक चे संचालक असून येथील त्वचारोग, सौंदर्यतज्ञ कुष्ठरोग, गुप्तरोग तज्ञ, कॉस्मेटिक व लेझर सर्जन म्हणून त्यांचा जिल्हाभरच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक आहे. हिंदुजा हॉस्पिटल मुंबई येथील त्यांना दांडगा अनुभव आलेला आहे. त्वचारोगाचे त्यांचे विशेष कार्य आहे. त्यांचे त्वचा रोगाचे रुग्ण जिल्हाभरातून आहेतच परंतु जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा त्यांच्याकडे त्वचारोगासाठी रुग्ण येतात. त्यांचा त्वचा रोगावरील अभ्यास दांडगा असल्यामुळे रुग्णांचा त्यांनी मोठा विश्वास संपादन केलेला आहे.
रुग्ण हेच देवता मानत रुग्णांची ते कधीही हेळसांड होऊ देत नाहीत. रविवारी मात्र ते आपल्या कुटुंबासमवेत कुटुंबांना व मित्र परिवारांना सांगतिक मेजवानी देत आपला गायकीचा छंद जोपासत असतात. प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गायकाच्या आवाजात एक रचना ते सोशल मीडियावरती फिरवत असतात. त्यांचा चाहता वर्ग खूप वाढलेला आहे. अत्यंत निर्मळ मनाचा डॉक्टर व मित्र जोपासणारा अतुट दोस्त म्हणून डॉ. चंद्रशेखर किसवे यांचा पंचक्रोशीत नावलौकिक झालेला आहे. आपला आवाज तंतोतंत मूळ गायकासारखा जरी येत नसला तरी आपला ते छंद सोडत नाहीत. आपणास ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने प्रामाणिकपणे प्रयत्न करत ते गात असतात परंतु दिवसेंदिवस त्यांच्या आवाजात जादूई किमया होत असून वरचेवर सुधारणा होत दिसून येत आहे. आपल्या सेवेत प्रामाणिकपणा दाखवत गायकाचा छंद जोपासणारा एक डॉक्टर म्हणून त्यांचा नावलौकिक होत आहे. एखादी गोष्ट आपल्याला आवडून त्याविषयी रस घेऊन ते जोपासणे म्हणजे छंद. यातूनच डॉ. चंद्रशेखर किसवे यांना एकवेगळा आनंद मिळतो, एक सकारात्मक समाधान मिळते. त्यांच्या छंदाविषयी बोलताना डॉ. चंद्रशेखर किसवे पाटील म्हणाले की, छंदातून अनेक फायदे आपणास होऊ शकतात.
दैनंदिन आयुष्य जगत असताना किमान आपण एक तरी छंद जोपासावा. तुमचा छंद तुम्ही जिवंत असल्याची अथवा तुम्हाला जगण्याची प्रेरणा देत असतो. छंद नसलेली व्यक्ती कायम रुक्ष आयुष्य जगत असते तर छंद जोपासणारे आयुष्याचा खरा आनंद घेत असतात. इतकेच नव्हे तर छंद जोपासणाऱ्या व्यक्तींचा मेंदू इतरांच्या तुलनेत तल्लख, प्रफुल्लित आणि ताजातवाना राहतो हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. त्यामुळे स्वतःला काय हवं आहे, स्वतःचा आनंद कशात आहे हे जाणून घ्यायला हवे. छंद आपल्या आयुष्यात अनमोल आनंद देऊ शकतात. छोट्या-छोट्या छंदांतून आपण आयुष्य समृद्ध करू शकतो. आनंद मिळण्यासाठी व्यक्ती स्वतःची आवड, हौस किंवा विरंगुळा जोपासते त्याला छंद म्हणणे अधिक योग्य ठरेल. तरुण असो वा वयोवृद्ध प्रत्येकाने एक तरी छंद जोपासावा कारण त्यातूनच आपली ओळख निर्माण होते, खरंखुरं समाधान मिळतं. छंद जोपासणारे आयुष्यात कमी वेळेत अधिक परिपक्व होतात. समाज, कार्यालय अथवा व्यवसायाच्या ठिकाणी त्याचा परिणाम दिसून येतो. अप्रत्यक्षपणे तुम्हाला एक नवी उंची देण्यासाठी तुमचे छंद उपयोगी पडतात. छंदामुळे तुम्हाला आयुष्यात वेगवेगळ्या परिस्थितीशी सामनाकरण्याची शक्ती मिळते. आपल्या समोरील आव्हानाबद्दल बोलताना डॉ. कचंद्रशेखर किसवे पुढे म्हणाले की, छंदामुळे नवी आव्हाने स्वीकारून ती पूर्णत्वास नेण्याकरिता दिशाही मिळत जाते. छंद हे एकप्रकारे आयुष्याचे व्हॅल्यू- ॲडिशन असतात.
त्यामुळे एक तरी छंद जोपासावा अन् त्यातून स्वतःचा शोध घ्यावा. छंद हे आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवितात आणि आपण छंदातून मानसिक समाधान मिळवते. हा छंद एखाद्या असाध्य रोगावर मात करून जीवन जगण्याची उभारी देतो. आयुष्यातील समस्यांना आणि कटकटींना कंटाळून जीवनाला विटलेले अनेक जण केवळ छंदामुळे आपले आयुष्य सुखी आणि समाधानाने जगल्याची अनेक उदाहरणे देता येतील माझा छंद जोपासण्यात माझ्या पत्नीचा खूप मोठा वाटा असल्याचेही डॉ चंद्रशेखर किसवे पाटील म्हणाले. डॉ. चंद्रशेखर केशवे यांनी गायलेले चुराके दिल मेरा, मुझे ना देखो तो चैन आता नही, मेरा देश मेरा मुल्क, तुझे अपना बनाने की कसम, तुम दिल की धडकन हो आदी गीत श्रोत्यांना खूप भावले. डॉ. किसवे यांनी जोपासलेल्या छंदाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
-दादाराव आगलावे, मुखेड.
संवाद: 9422874747.