तरंग अंतरीचे या कविता संग्रहातील कविता या परिसंवादाचा विषय आहे –  ग्रामीण कवी शंकर वाडेवाले

 

अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे ) येथील सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील खंडाळीकर लिखित आणि मुक्त रंग प्रकाशन प्रकाशित चिंतन एका कार्यकर्त्याचे , वैचारिक लेख संग्रह आणि तरंग अंतरीचे या कविता संग्रहातील कविता या परिसंवादाचा विषय आहे. असं प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण कवी शंकर वाडेवाले यांनी केले.

लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हाॅटेल अंजनीच्या सभागृहात महाराष्ट्र अंनिस लातूर जिल्हा आणि पुस्तक प्रकाशन संयोजन समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य दादासाहेब पौळ गुरुजी होते. काव्यपीठावर जेष्ठ विचारवंत आणि संपादक डॉ नागोराव कुंभार, प्रा निशिकांत देशपांडे, शिवाजी मरगीळ,मच्छिंद्र गोजमे, श्री सुनील खंडाळीकर आणि सौ दुर्गा सु खंडाळीकर उपस्थित होते.

चिंतन एका कार्यकर्त्याचे या वैचारिक लेख संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत डॉ नागोराव कुंभार यांच्या हस्ते झाले. प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने साहित्य आणि साहित्यिक यांची लोकशाहीसी बांधीलकी या विषयावर प्राचार्य डॉ नागोराव कुंभार यांचे व्याख्यान झाले.

पुढं बोलताना शंकर वाडेवाले म्हणाले की या कविता संग्रहातील कविता या परिसंवादाचा विषय आहे. त्या विखारी नाहीत तर विचारी आहेत. सुनील खंडाळीकर यांचा परिचय संजय लाडके यांनी करून दिला. प्रा गोविंदराव शेळके, ज्ञानेश्वर भोसले,एन डी राठोड, बाबुराव श्रीमंगले, माळी सर, बाबुराव आरसुडे, शाहीर सुभाष साबळे, प्रा प्रभाकर तिडके आणि प्रा भगवान आमलापुरे हे अहमदपूर येथील रसिक या दोन्ही पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *